कॉपी पुरविणाऱ्या आठ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:05 IST2020-03-16T12:05:35+5:302020-03-16T12:05:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावीच्या शनिवारी झालेल्या पेपरला बाहेरून कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाºया तळोद्यातील पाच, नवापूरातील दोन तर ...

Action on eight persons who provided the copy | कॉपी पुरविणाऱ्या आठ जणांवर कारवाई

कॉपी पुरविणाऱ्या आठ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दहावीच्या शनिवारी झालेल्या पेपरला बाहेरून कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाºया तळोद्यातील पाच, नवापूरातील दोन तर अक्कलकुवा येथे एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहावी परीक्षा केंद्राच्या परिसरात पोलिसांनी मनाई आदेश लागू केले आहेत. त्याचे उल्लंघन करून अनेकजण परिक्षार्र्थींना कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्रात प्रवेश करून अडथळा आणतात. याप्रकरणी शनिवारी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तळोदा येथील न्यू हायस्कूल केंद्रात दोन, शेठ के.डी.हायस्कूल केंद्र परिसरात दोन तर वरिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्र परिसरात एकावर कारवाई करण्यात आली.
नवापूर येथे सार्वजनिक हायस्कूलच्या परीक्षा केंद्र परिसरात आणि शिवाजी हायस्कूलच्या परीक्षा केंद्र परिसरात अशा दोन जणांवर तर अक्कलकुवा येथे अँग्लो उर्दू हायस्कूल परीक्षा केंद्र परिसरात एका जणावर ही कारवाई करण्यात आली. त्या त्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: Action on eight persons who provided the copy