शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

२०३ गुन्ह्यात २२५ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांवर शहर पोलीस ठाण्यातर्फे गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांवर शहर पोलीस ठाण्यातर्फे गेल्या तीन महिन्यात कारवाई करण्यात आली. तब्बल २०३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात येवून १२३ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.२४ मार्चपासून लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध प्रतिबंधात्मक आदेश देखील लागू करण्यात आले होते. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात विनामास्क फिरणे, विनाकारण दुचाकीवर शहरात फिरणे, दोन सीट दुचाकीवर फिरणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे यासह इतर कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. त्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी व पॉर्इंट लावण्यात आले होते. एकुण २०३ गुन्ह्यात २२५ जणांवर कारवाई करण्यात आली.मार्च महिन्यात ३६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एप्रिल महिन्यात ३९ केसेस करून ७८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मे महिन्यात ८१ केसेस करून ३४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तर जून महिन्यात आतापर्यंत ४७ केसेस करून १८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.एकुण १२३ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील ६३ गुन्हे शाबीत होऊन ७२ जणांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात आली. एकुण एक लाख ५३ हजार रुपये दंड आकारण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर व अधिकारी आणि कर्मचाºयांनी केली.