शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून पावसाच्या विश्रांतीमुळे पेरण्यांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तीन दिवसांपूर्वी पडलेला पाऊस हा केवळ सातपुड्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तीन दिवसांपूर्वी पडलेला पाऊस हा केवळ सातपुड्यातील दुर्गम भागात झाला होता. त्यामुळे सुसरी व गोमाई नदीला पूर आला होता. पावसाने विश्रांती घेतल्याने पेरण्यांना वेग आला आहे. दरम्यान, गेल्या ४ दिवसांपासून कृषी सेवा केंद्र दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरू राहत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी अडचणीचे ठरत होते.नंदुरबार जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. त्यानंतर मान्सूनच्या सरी या आठवड्यात आल्या होत्या. जिल्ह्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला होता. पेरणीलायक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. आता मात्र तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचे वातावरण देखील तयार होत नसल्याची स्थिती आहे.शनिवारी दुपारी तर कडकडीत ऊन देखील पडले होते. पावसाच्या उघडीपमुळे मात्र शेतकºयांनी पेरण्यांना वेग दिला आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात २० ते २५ टक्के खरीप क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. दोन ते तीन दिवसात ते प्रमाण ५० टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे.सद्य स्थितीत सर्वाधिक भर हा कापूस लागवडीवर असल्याचे चित्र आहे. त्याखालोखाल सोयाबीन आणि मकाचे क्षेत्र असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.पेरण्यांची लगबग सुरू असल्यामुळे बाजारात बियाणे खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी होत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे बियाण्यांची दुकाने गेल्या ४ दिवसांपासून सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येत होती. त्यामुळे चार दिवस शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.औषधी दुकानांप्रमाणेच बियाणे व खतांची दुकाने अर्थात कृषी सेवा केंद्र देखील दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी कृषी सेवा केंद्र चालकांनी केली होती. परंतु त्याला मान्यता देण्यात आली नव्हती. शनिवारपासून दिवसभर अर्थात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.