शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आ देखे जरा, किसमे कितना है दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 14:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतीतील यांत्रिकीकरणामुळे ‘सालदार’की आता कालबाह्य ठरली आहे. परंतु पूर्वी अक्षय तृतीयेला सालदार ठरवितांना जी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतीतील यांत्रिकीकरणामुळे ‘सालदार’की आता कालबाह्य ठरली आहे. परंतु पूर्वी अक्षय तृतीयेला सालदार ठरवितांना जी पद्धत व परंपरा होती ती येथील माळीवाड्यात आजही कायम आहे. ‘आ देखे जरा, किसमे कितना है दम...’ म्हणत जो जास्त वजनाचा दगड उचलेल त्याला सालदार ठेवले जात होते आता केवळ औपचारिकता म्हणून दगड उचलून ही परंपरा पाळली जात आहे. यंदा लॉकडाऊन, संचारबंदी व कोरोनाची दहशत यामुळे फारसा उत्साह दिसून आला नाही.खान्देशात पूर्वी अक्षय तृतीयेला सालदारांचे नवीन वर्ष सुरू होत होते. याच वेळपासून नवीन सालदाराचीही नेमणूक केली जात होती. पूर्वी शेतीचे यांत्रिकीकरण नव्हते, त्यामुळे केवळ मणुष्यबळावरच शेतीची कामे अवलंबून राहत होती. त्यामुळे सालदारांना मोठी मागणी राहत होती. वर्षाचे ठराविक पैसे देवून, धान्य व कपडे देवून त्याची राहण्याची व्यवस्था शेतकऱ्याकडे करावी लागत होती. सालदार ठरवितांना अनेक प्रथा व परंपरा होत्या. त्यातीलच एक नंदुरबारातील माळीवाड्यातील ‘दगड उचलण्याची’ प्रथा होय. माळीवाड्यातील सार्वजनिक चौकात अक्षय तृतीयेला पूर्वी पहाटेपासूनच ही स्पर्धा सुरू होत होती. त्यासाठी पंचक्रोशीतील अनेकजण उपस्थित राहत होते. एक क्विंटलपासून पाच क्विंटलपर्यंत वजनाचा दगड एका दमात उचलून तो खांद्यावर ठेवण्याची ही स्पर्धा राहत होती. जो व्यक्ती एका दमात दगड उचलत होता. त्याला सालदार म्हणून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांमध्येही स्पर्धा लागत होती. अशावेळी जास्तीत जास्त पैसा जो देईल त्या शेतकºयाला असे सालदार पसंती देत होते.आता ही परंपरा कालबाह्य ठरली असली तरी त्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी अक्षय तृतीयेला ही स्पर्धा घेतली जाते. आता सालदार न ठेवता एका दमात जो दगड उचलेल त्याला रोख रक्कम म्हणून बक्षीस दिले जाते.रविवारी देखील सकाळपासूनच याची उत्सूसता होती. परंतु संचारबंदी आणि सोशल डिस्टन्सिगचे नियम यामुळे गर्दीवर यंदा नियंत्रण राहिले. जास्तीत जास्त एक क्विंटलपर्यंत दगड उचलण्यात यावेळी यश आले. माणिक माळी यांनी दगड उचलणाºया युवकांना प्रोत्साहन दिले.