प्रेमसंबंध ठेवले व लग्नास नकार दिल्याने नैराश्येतून युवतीची आत्महत्या

By मनोज शेलार | Updated: December 22, 2023 17:42 IST2023-12-22T17:42:35+5:302023-12-22T17:42:53+5:30

याप्रकरणी २१ डिसेंबर रोजी नवापूर पोलिसांत युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

A young woman commits suicide due to depression due to love affair and refusal to marry | प्रेमसंबंध ठेवले व लग्नास नकार दिल्याने नैराश्येतून युवतीची आत्महत्या

प्रेमसंबंध ठेवले व लग्नास नकार दिल्याने नैराश्येतून युवतीची आत्महत्या

नंदुरबार : प्रेमसंबंध ठेवत ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने नैराश्येत गेलेल्या २१ वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चौकी, ता. नवापूर येथे घडली. याप्रकरणी २१ डिसेंबर रोजी नवापूर पोलिसांत युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सूत्रांनुसार, मोरथुवा, ता. नवापूर येथील सेजल शरद गावित (२१) या युवतीचे गणेश कोट्या गावीत (२६) याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यातून युवक गणेश याने युवतीशी लग्न करण्याचे सांगितले होते. परंतु, ऐनवेळी त्याने लग्नास नकार देत ‘तुला काय करायचे ते कर’ असे सांगून प्रेमसंबंध तोडले. यामुळे सेजल गावित ही नैराश्येत गेली. त्यातूनच तिने घराशेजारील आंब्याच्या झाडास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप युवतीच्या वडिलांनी केला.

त्यावरून युवक गणेश कोट्या गावित, रा. काटवणपाडा, ता. नवापूर याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.

Web Title: A young woman commits suicide due to depression due to love affair and refusal to marry