राणीपूर येथे सोयरीक जमवण्याच्या वादातून एकास मारहाण

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: May 10, 2023 18:56 IST2023-05-10T18:55:57+5:302023-05-10T18:56:31+5:30

याप्रकरणी रमेश गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमरसिंग, हिरालाल, विकेश आणि रमाबाई यांच्याविरोधात म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A man was beaten up in Ranipur due to a dispute over affinity issue | राणीपूर येथे सोयरीक जमवण्याच्या वादातून एकास मारहाण

राणीपूर येथे सोयरीक जमवण्याच्या वादातून एकास मारहाण

नंदुरबार : शहादा तालुक्यातील राणीपूर गावात सोयरीक जुळवण्यास नकार दिल्याने एकास मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसात चाैघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश भैय्या गोसावी, रा. वडगाव, ता. शहादा, असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

रमेश गोसावी यांच्या पुतण्यासोबत मुलीची सोयरीक जुळवण्यासाठी अमरसिंग गुलाबसिंग राठोड हा आला होता. या गोष्टीला रमेश गोसावी यांनी नकार दिल्याने राठोड कुटुंबीयांनी वाद घातला होता. या वादातून अमरसिंग राठोड (५९), हिरालाल अमरसिंग राठोड (३५), विकेश अमरसिंग राठोड (२९), रमाबाई अमरसिंग राठोड (५०) या चाैघांनी रमेश गोसावी यांना शिवीगाळ करून हाताबुक्कीने मारहाण केली होती. 

याप्रकरणी रमेश गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमरसिंग, हिरालाल, विकेश आणि रमाबाई यांच्याविरोधात म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक अजित गावित करत आहेत.
 

Web Title: A man was beaten up in Ranipur due to a dispute over affinity issue