शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 88 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळ छायेत असलेल्या शेतक:यांना पावसाने दिलासा दिल्याने 88 टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुष्काळ छायेत असलेल्या शेतक:यांना पावसाने दिलासा दिल्याने 88 टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ पावसामुळे उत्साह दुणावल्याने शेतक:यांनी कापसासह इतर खरीप पिकांची पेरणी करण्यास वेग दिला असल्याने येत्या दोन दिवसात किमान 101 टक्के शेतीक्षेत्रात पूर्ण होण्याची शक्यता आह़े  गेल्या वर्षी अल्पपजर्न्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागल्याने शेतकरी हैराण झाले होत़े यंदा जून महिन्याच्या मध्यात पावसाने यथातथा हजेरी लावल्याने चिंता वाढल्या होत्या़ यामुळे शेतशिवारात पेरण्यांची स्थिती बिकट होती़ यंदाही दुष्काळा भोगावा लागतो की, काय अशी स्थिती असताना गेल्या दोन दिवसात पावसाने जिल्ह्यात सर्वदूर जोर धरल्याने पेरणी केलेल्या पिके तरारली आहेत़ दुसरीकडे पावसाअभावी थांबलेल्या पेरण्यानांही वेग देण्यात आला असून शेतातील ओलव्याच्या बळावर कामे आटोपण्यास शेतकरी भर देत असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान  नंदुरबार आणि नवापुर तालुक्यात गत 15 दिवसांपासून पावसाअभावी थांबलेली शेतीकामे गत दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पुन्हा वेगात सुरु झाल्याचे चित्र आह़े जिल्ह्यात आजअखेरीस भात 48 टक्के, ज्वारी 89, बाजरी 33, मका 84, तूर 94, मूग 57, उडीद 77, भूईमूग 82, सोयाबीन 65 तर 114 टक्के क्षेत्रात कापसाची लागवड पूर्ण झाली आह़े नंदुरबार तालुक्यात आजअखेरीस 55 हजार 977, नवापुर 42 हजार 927, शहादा 69 हजार 107, धडगाव 17 हजार 254, तळोदा 20 हजार 779 तर अक्कलकुवा तालुक्यात 40 हजार 511 हेक्टर क्षेत्रात पिकांचा पेरा पूर्ण झाल्याची माहिती आह़े सर्वाधिक 107 टक्के पेरणी ही शहादा तालुक्यात करण्यात आली असून तुलनेने माघारी असलेल्या नवापुर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतीकामांना सुरुवात झाली आह़े 

शेतक:यांनी यंदाही कापसाला सर्वाधिक पसंती दिली असल्याने लागवड क्षेत्रातून दिसून येत आह़े यंदा 1 लाख 6 हजार क्षेत्रात सरासरी कापूस लागवड होण्याची शक्यता होती़ परंतू शेतक:यांनी यापेक्षा अधिक कापूस लागवड केली आह़े नंदुरबार तालुक्यात 37 हजार 505, नवापुर8 हजार 411, शहादा 35 हजार 488, तळोदा 9 हजार 798, धडगाव 91 तर अक्कलकुवा तालुक्यात 14 हजार 13 हेक्टर असा एकूण 1 लाख 21 हजार 676 हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड करण्यात आली आह़े अक्कलकुवा वगळता सर्वच तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक कापूस लागवड झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आह़े जिल्ह्यात 2 लाख 77 हजार 821 हेक्टर क्षेत्रापैकी 2 लाख 45 हजार 555 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी यात कापसाचा सर्वाधिक वाटा आह़े यात वाढ होणे अपेक्षित असल्याने येत्या काळात निर्धारित क्षेत्रात 20 ते 25 टक्के अधिक क्षेत्रात पिकांची पेरणी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े कापसानंतर दुस:या क्रमांकाच्या पसंतीचे पिक म्हणून सोयाबीनला पसंती दिल्याचे चित्र असून 17 हजार 636 हेक्टर पेरणी पूर्ण झाली आह़े