शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधून ६७६ मजूर आपल्या गावी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या प्रयत्नामुळे गुजरात येथे अडकलेले ६७६ मजूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या प्रयत्नामुळे गुजरात येथे अडकलेले ६७६ मजूर आपल्या गावी परतले आहेत. याशिवाय राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि पालघर येथून देखील नागरिकांना जिल्ह्यात आणण्यात आले आहे. पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्या सूचनेनुसार दोन्ही प्रकल्प कार्यालयांनी मजुरांना परत आणण्यासाठी नियोजन केले.जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाशी आणि जिल्ह्यातील समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. तिथल्या मजुरांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी शैलेश पाटील, अमोल मटकर, राहूल इधे आणि किरण मोरे या चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. द्वारका येथील २२०, पोरबंदर ५५, वापी १०३, आणंद ३७, जामनगर ५९, बडोदा ३२, गांधीनगर ४३, भरूच १०२, दमण २५ अशाप्रकारे एकूण ६७६ मजुरांना परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाºयांनी परिश्रमपूर्वक सर्व मजुरांच्या जिल्हानिहाय याद्या तयार करून वाहनाची सोय केली. आदिवासी विभागामार्फत न्यूक्लिअस बजेटच्या माध्यमातून वाहन खर्चाची सुविधा करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे यातील बरेचसे मजूर गावाकडे परतले असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सीमेवर सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. तसेच या मजुरांच्या भोजनाचीदेखील सोय करण्यात आली. मजुरांचा रोजगार गेल्याने त्यांना मनरेगाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्यात येणार आहे.सर्व मजूर विविध ठिकाणी विखुरलेले असल्याने त्यांना एका ठिकाणी आणून परत आणणे हे मोठे आव्हान होते. अधिकारी-कर्मचाºयांच्या उत्तम समन्वयाने ते शक्य झाले. पुढच्या टप्प्यात या मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या गावात परतल्याचा त्यांना आनंद असल्याने संपूर्ण टीमसाठी ही समाधानाची बाब आहे.-वसुमना पंत,प्रकल्प अधिकारी, नंदुरबार.गुजरातमधील नऊ जिल्ह्यातून आणि राज्यातील विविध भागातून आदिवासी नागरिकांना त्यांच्या गावात आणण्यासाठी एकाचवेळी विविध पातळ्यांवर नियोजन सुरू होते. त्यांची माहिती मिळविणे हेदेखील आव्हान होते. नंदुरबार आणि गुजरातच्या प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळाल्याने हे मजूर गावाकडे परतू शकले.-अविशांत पांडा,प्रकल्प अधिकारी, तळोदा.