शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५९२ गावे तूर्त कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना समाधानाची बाब म्हणजे आजच्या दिवशी तब्बल ५९२ गावांमध्ये एकही सक्रिय ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना समाधानाची बाब म्हणजे आजच्या दिवशी तब्बल ५९२ गावांमध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही तर ३५५ गावांमध्ये सुमारे तीन हजार ९७२ रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरी भागात सहाही शहरांमध्ये चार हजार ५६६ पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्यावर्षी सुरुवातीच्या काळात कोरोना नियंत्रणात होता. १७ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर मात्र विविध ठिकाणी रुग्ण सापडत होते. परंतु सुरुवातीच्या लाॅकडाऊनच्या काळात विविध गावांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले. नव्हे तर अनेक गावांनी आपल्या सीमांवर सुरक्षा रक्षक बसवून बाहेरील लोकांना गावबंदी केली. काहींनी तर रस्त्यावर दगड ठेवून, काटे ठेवून, खोदकाम करून रस्तेच बंद केले होते. रात्रीची गस्त ग्रामस्थांनी सुरू केली होती. त्यामुळे रुग्ण आटोक्यात होते. मात्र ऑगस्ट-सप्टेंबरनंतर प्रमाण वाढले. नोव्हेंबरपासून प्रमाण पुन्हा कमी झाले होते. परंतु मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेली दुसरी लाट मात्र पहिल्या लाटेपेक्षा गंभीर असून त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने सुरुवातीला शनिवार-रविवार दोन दिवसाचा जनता कर्फ्यू, त्यानंतर पूर्ण संचारबंदी राज्यात प्रथमच लागू केली होती. मात्र रुग्णसंख्या रोज ८०० ते हजारापर्यंत आढळून येत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.

आजच्या स्थितीत जिल्ह्यातील गावांचा आढावा घेतला असता तब्बल ५९२ गावांमध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही. यातील अनेक गावात रुग्ण आढळले होते पण ते बरे झाले आहेत. या ५९२ गावांमध्ये सर्वाधिक गावे धडगाव तालुक्यातील आहेत. या तालुक्यातील १२९ गावांमध्ये एकही रुग्ण नाही. तर त्यापाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यातील १६८ गावांमध्ये एकही रुग्ण नाही. नंदुरबार तालुक्यातीलही ११६ गावांमध्ये एकही रुग्ण नाही. तर शहाद्यातील ६६, नवापुरातील ५९ आणि तळोद्यातील ५४ गावांमध्ये एकही रुग्ण नाही.

३५५ गावांमध्ये सध्या सक्रिय रुग्ण

जिल्ह्यात सध्या ३५५ गावांमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या गावांमध्ये कमीत कमी एक किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे शहादा तालुक्यात ११४ गावांमध्ये रुग्ण आहेत तर नवापूर तालुक्यातील १०५, तळोदा ४०, नंदुरबार ३९, धडगाव ३१ आणि अक्कलकुवा तालुक्यातील २६ गावांमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत. या सर्व गावांमध्ये सुमारे ३५९ कन्टेन्मेन्ट झोन असून तीन हजार ९७२ रुग्ण उपचार घेत आहेत.

शहरी भागात चार हजार ५६६ रुग्ण

जिल्ह्यात तालुका मुख्यालयाची एकूण सहा शहरे असून सर्व ठिकाणी सध्या सक्रिय रुग्ण कार्यान्वित आहेत. या सहाही शहरांमध्ये १९२ कन्टेन्मेन्ट झोन असून तेथे चार हजार ५६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नंदुरबारला ३ हजार ४८४, नवापुरात ४४३, शहाद्यात २९१, तळोद्यात १९७, अक्कलकुव्यात ८० तर धडगाव येथे ७१ रुग्ण आहेत. हे सर्व शहरी भागातील रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.