विसर्जनावेळी ६ जणांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 04:08 IST2019-09-07T04:08:52+5:302019-09-07T04:08:58+5:30
वडछील गावात हरदास समाजाची वस्ती आहे. तेथे गणेशोत्सव साजरा होतो. शुक्रवारी गणेश विसर्जन करण्यासाठी

विसर्जनावेळी ६ जणांचा बुडून मृत्यू
शहादा (नंदुरबार) : वडछील येथील गवळीवाडा भागातील सहा तरुणांचा गणेश मूर्ती विसर्जनावेळी कमरावद येथील जलाशयात बुडून शुक्रवारी मृत्यू झाला. मृतांपैकी चार जण एकाच कुटुंबातील आहेत. त्यात दोन सख्खे भाऊ होते.
वडछील गावात हरदास समाजाची वस्ती आहे. तेथे गणेशोत्सव साजरा होतो. शुक्रवारी गणेश विसर्जन करण्यासाठी वस्तीतील नऊ तरुण गावाजवळच दोन किलोमीटर अंतरावरील कमरावद येथील म्हसोबा लघुप्रकल्पावर गेले होते. तेथे गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यासाठी सहा जण पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने त्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. इतरांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. दुर्घटनेत कैलास संजय चित्रकथे (१९), सचिन चित्रकथे (१९), विशाल चित्रकथे (१७), दिपक सुरेश चित्रकथे (२१), रवींद्र शंकर चित्रकथे (२९), सागर आप्पा चित्रकथे (२०) यांचा बुडून मृत्यू झाला.