शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्याच्या बैलबाजारात ३० लाखांची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून अवकळा आलेल्या तळोद्याच्या बैलबाजारास काहीअंशी भरभराट आली आहे. कारण ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून अवकळा आलेल्या तळोद्याच्या बैलबाजारास काहीअंशी भरभराट आली आहे. कारण शुक्रवारच्या बाजारात साधारण १५० बैलांची आवक होऊन जवळपास ३० लाखांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजारात थोडीफार तेजी आल्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच बाजार समितीच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत.गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यभरात लॉकडाऊन सुरू केले होते. मात्र या लॉकडाऊनमध्ये शासनाने थोडी शिथिलता दिली आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनानेदेखील राज्य शासनाच्या सूचनेवरून व शेतकऱ्यांचा खरीप हंगाम लक्षात घेऊन बैल बाजार भरणाºया जिल्ह्यातील बाजार समित्यांना शासनाच्या नियमांचे पालन करून गेल्या २३ मे पासून बैल बाजार भरण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार तळोदा बाजार समितीने आपल्या बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगची आखणी करत बैल बाजाराचे नियोजन केले होते. परंतु बैल व्यापाºयांनी कोरोनाची भिती व वाहतुकीची अडचण यामुळे गेल्या दोन बाजारापासून तळोद्याच्या बैल बाजाराकडे पाठ फिरविली होती. शिवाय बाजार समितीच्या कर्मचाºयांमध्येही चिंतेचे सावट होते. तथापि बाजार समिती प्रशासनाने नियमितपणे विक्रीसाठी येणाºया बैल व्यापाºयांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत बैल विक्रीसाठी आणण्याची विनंती केली. शिवाय भयमुक्त वातावरणाची हमी दिली. कर्मचाºयांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन व्यावसायिकांनी शुक्रवारच्या बैल बाजारात आपली बैले विक्रीसाठी आणली होती. साधारण १५० बैलांची आवक झाली होती. यातून साधारण तीन लाखांची उलाढाल झाल्याचेही बाजार समितीच्या प्रशासनाने सांगितले. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून शुकशुकाट असलेल्या बाजार समितीच्या आवार गजबजलेला दिसून आला होता. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांना बैल बाजाराची घरघर लागली असतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळोद्याच्या बैल बाजाराने थोडी का असेना उसळी घेतल्याने कर्मचाºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बाजार समितीने हे चित्र कायम राखण्याची अपेक्षाही शेतकºयांनी व्यक्त केली आहे.