शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नव्याने २६१ अंगणाडींना इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आदिवासी विकास योजना आणि आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत २६१ अंगवाडी इमारत बांधकामास गेल्या वर्षभरात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात आदिवासी विकास योजना आणि आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत २६१ अंगवाडी इमारत बांधकामास गेल्या वर्षभरात मंजूरी देण्यात आली आहे. नवीन अंगणवाडी बांधकाम आणि २०१६ पासून अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या निदेर्शानुसार आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमाती उपयोजना (टीएसपी) अंतर्गत २०० अंगणवाड्यांसाठी ११ कोटी ८१ लाख ८० हजार वितरीत करण्यात आली आहे. तर आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत ६१ अंगणवाड्यांना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन कोटी ९० लाख ८० हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. टीएसपी अंतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये अक्कलकुवा ९५, धडगाव ४६, तळोदा १२, शहादा १९, नंदुरबार आठ आणि नवापूरमधील २० अशा २०० अंगणवाड्यांचा समावेश आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये अक्कलकुवा एक, मोलगी चार, धडगाव १६, खुंटामोडी तीन, तळोदा पाच, शहादा १३, म्हसावद सहा, नंदुरबार सहा, रनाळा सहा नवापूरमधील एक अशा ६१ अंगणवाड्यांचा समावेश आहे.अंगणवाडीमध्ये पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी संदर्भ आरोग्य सेवा, अनौपचारीक शिक्षण, आरोग्यविषयक शिक्षण आदी सेवा पुरविल्या जातात. अंगणवाडी नसल्याने ग्रामीण भागात या सेवा पूर्ण क्षमतेने देण्यात अडचणी निर्माण होतात. अमृत आहार व घरपोच आहार वाटपासाठीदेखील अंगणवाडी महत्वाची आहे. अंगणवाडी बांधकामामुळे या समस्या दूर होणार आहेत.दुर्गम भागातील अनेक अंगणवाडी इमारती या कुडाच्या घरात किंवा भाड्याच्या घरात भरत असतात. त्यामुळे आता त्यांना हक्काच्या इमारती मिळणार आहेत.