शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईचे १३ कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आॅक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत 'क्यार' आणि 'महा' चक्रीवादळ व अवेळी पावसामुळे झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात आॅक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत 'क्यार' आणि 'महा' चक्रीवादळ व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली होती. त्यानुसार मदत वाटपासाठी दुसऱ्या टप्प्यात १३ कोटी ३४ लाख ८७ हजार ४१० रुपयांचा निधी नंदुरबार जिल्ह्याला प्राप्त झाला असून तो तालुक्यांना वितरित करण्यात आला आहे. यापूर्वी तीन कोटी ६२ लाख २१ हजार रुपये वितरित करण्यात आले होते.राज्यामध्ये अवकाळी झालेल्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर एकत्रित अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार एकूण १६ कोटी ९७ लाख आठ हजार ४१० रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील निधीचे वितरण तालुक्यांना करण्यात आले आहे. दुसºया टप्प्यात नवापुर तालुक्यास २० लाख ,शहादा १७ लाख, तळोदा दोन लाख सात हजार ५००, अक्कलकुवा दोन कोटी ६४ लाख ५० हजार, तर अक्राणीसाठी दहा कोटी ३१ लाख २९,९१० इतका निधी बाधीत शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तहसिलदाराना वितरीत करण्यात आला आहे.आपदग्रस्त शेतकºयांना शेतीपिकांसाठी आठ हजार रुपये प्रति हेक्टर तर फळबागांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर दराने दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे.बाधित शेतकºयांच्या बाधित खात्यात अनुदानाची रक्कम जमा करणयात यावी. मदतीच्या रकमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. यासाठी सहकार विभागाने योग्य आदेश निर्गमित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.