शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात १८ लाख अंडी केली नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST

नवापूर : परिसरामध्ये पाचव्या दिवशी ६ पोल्ट्रीतील ५१ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहे. १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीत ...

नवापूर : परिसरामध्ये पाचव्या दिवशी ६ पोल्ट्रीतील ५१ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहे. १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीत दोन टप्प्यात १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नाश करण्यात आली आहे. गुरुवारी पुन्हा चार अहवाल बर्ड फ्लू एच ५एन ८ या विषाणूबाधित आले आहे. यामुळे नवापूर शहरातील आतापर्यंत २० पोल्ट्रीतील अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. उर्वरित सात पोल्ट्रीतील अहवाल पाठवण्यात आले आहे. सर्व पोल्ट्रीतील कुकुट पक्षी व अंडी नष्ट करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.

दररोज अहवाल पॅाझिटिव्ह येत असल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. गुरुवारी सहा पोल्ट्री फार्ममध्ये किलिंग ऑपरेशन दिवसभरामध्ये राबविण्यात आले.

यात मुस्तफा पोल्ट्रीत सात हजार ६०९, सफा पोल्ट्री ६ हजार ७७, न्यू शांती पोल्ट्री नऊ हजार ९२७, जस पोल्ट्रीत ५ हजार ३९८ शाहीन पोल्ट्री १६ हजार २१९, एफसन्स पोल्ट्री ६ हजार ११ असे एकूण सहा पोल्ट्रीत दिवसभरात ५१ हजार २४१ पक्षी नष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत २७ पोल्ट्रीमधून १६ पोल्ट्रीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

१६ पोल्ट्रीतील सर्व पक्षी नष्ट करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत तीन लाख ७९ हजार ४५४ पक्षी नष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

गुरुवारी २७ पोल्ट्रीमधील सर्व अंडीचे मोजमाप व पंचनामा करून अंडी नष्ट केली. १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीत दोन टप्प्यात १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नष्ट करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील श्रेयस पोल्ट्री, २३ हजार ६९५ अंडी मुस्तुफा पोल्ट्री-(पिंपळनेर रोड ) २ लाख ३७ हजार, मुस्तुफा (लहान चिंचपाडा)००, परवेज पोल्ट्री २७ हजार ८१०, सफा पोल्ट्री २६ हजार ७७०,शाईन पोल्ट्री ४८ हजार ७००,डायमंड पोल्ट्री ६ लाख १७ हजार ८२०, न्यू डायमंड ३३ हजार ३९० एकूण ९ लाख ८१ हजार ८८५ अंडी नाश करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील न्यू शांती पोल्ट्री ७२ हजार १२०,जस पोल्ट्री ९३ हजार ५१०,शिश पोल्ट्री ७४ हजार ६१०,सहयोग पोल्ट्री २ लाख ७२ हजार ५००, एप्सन पोल्ट्री ३२ हजार ३४०,वासिम पोल्ट्री १ लाख २६ हजर ९६०,पालावाला पोल्ट्री २ लाख ६९ हजार ९७०, आमलीवाला पोल्ट्री १३ हजार ९५० असे एकूण आठ पोल्ट्रीतील ८ लाख ९५ हजार ९६० अंडी नष्ट करण्यात आली.

दिवसभरात ९५ पथकाने १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीतील १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नष्ट करून खड्ड्यात पुरवण्यात आली आहे. उर्वरित ११ पोल्ट्रीतील अंडी अहवाल आल्यानंतर टप्प्या टप्प्याने नाश करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी दिली आहे.