शहरं
Join us  
Trending Stories
1
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
2
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
3
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
4
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
5
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
6
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
7
Top Marathi News Live: नितीश कुमारांचा मुलगा बनला मंत्री, निशांत कुमार यांनी घेतली शपथ
8
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
9
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
10
Video - हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
11
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
12
Mangala Thoke : शिकण्याची जिद्द! दिवसा घरकाम, रात्री अभ्यास; ६८ वर्षांच्या आजींनी ६०% गुणांसह पास केली बारावी
13
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
14
अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!
15
Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
16
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
17
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
18
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
19
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
20
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरातील १६ जण क्वारंटाईन कक्षात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : शहरालगत उच्छलच्या पाड्यावरील कोरोना पॉझीटीव्ह २४ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या राज्यातील १६ जणांना विलगीकरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : शहरालगत उच्छलच्या पाड्यावरील कोरोना पॉझीटीव्ह २४ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या राज्यातील १६ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दोन राज्यांच्या सीमेवर घडलेल्या या प्रकारामुळे दोन्हीकडून उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत.
गुजरातमधील उच्छलच्या हनुमानफळीत राहणारी २४ वर्षीय महिला गुजरातच्या अहमदाबाद येथून १८ मे रोजी परतली होती. होम क्वॉरंटाईन केलेल्या या महिलेस २२ मे रोजी ताप आल्याने स्वॅब घेण्यात आला. २३ मे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच धावपळ झाली. शहरातील रेल्वेस्थानक समोरील वसाहत व हनुमानफळी हा भाग लागून आहे़ समोर वाकीपाडा ही नवापुर तालुक्यातील करंजी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणारी लोकवस्ती आहे़ उच्छल येथील तालुका प्रशासनाने हनुमानफळी सील करुन उच्छल शहर बंद न करता उच्छलच्या सर्व पाडयांवर औषध फवारणी हाती घेउन इतर आवश्यक कार्य लागलीच हाती घेतले. नवापुरच्या स्थानिक प्रशासनाने वाकीपाडा, रेल्वेस्थानक परिसर सील करुन संबंधित महिलेच्या संपर्कात कोण कोण आले याची माहिती काढली. लागून असलेल्या या वसाहतीमधून शहर व तालुका हद्दीतील १६ जणांचा संपर्क आढळून आल्याने त्या सर्वांना वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्या सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असुन त्याच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. रेल्वेस्थानक परिसर लागुन असल्याने हा परिसर कंटेंटमेंट झोन तर समोरील वाकीपाड्याचा भाग बफर झोन घोषीत आहे़ परिसरात आरोग्य तपासणीचे कार्य हाती घेतले आहे. मंगळवारपर्यंत ही तपासणी पुर्ण करण्याचे नियोजन स्थानिक प्रशासनाने केले आहे. येत्या दोन आठवड्यापर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. खबरदारी म्हणुन प्रशासनाकडुन उपाय योजना केल्या जात असुन नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे असे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व तहसिलदार सुनिता जºहाड यांनी कळवले आहे़

दरम्यान उच्छल येथील महिलेच्या एक वर्षाच्या बाळासह पतीचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती गुजरात आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे़ ही बाब नवापुर शहर आणि तालुक्यासाठी दिलासादायक असल्याने समाधान व्यक्त होत आहे.