शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

14 लघुसिंचन प्रकल्पांमध्ये अद्यापही ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:29 IST

नरेंद्र गुरव ।  लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा, धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील 14 लघुसिंचन प्रकल्पांमध्ये पावसाळा सुरू ...

नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा, धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील 14 लघुसिंचन प्रकल्पांमध्ये पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी आजच्या स्थितीला ठणठणाट आहे. यातील काही लघुप्रकल्पांना गळती लागली असून ती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.पाटबंधारे विभागाच्या शहादा उपविभागांतर्गत तळोदा तालुक्यात चार, अक्कलकुवा दोन, शहादा सात तर धडगाव तालुक्यात एक असे  14 लघुसिंचन प्रकल्प आहेत. तळोदा तालुक्यात रोझवा हे छोटे धरण असून त्यात 8.80 टक्के पाणीसाठा आहे. पाडळपूर प्रकल्पात 10.60              टक्के, सिंगसपूर  53 टक्के           पाणीसाठा असून गढावली प्रकल्पात फक्त 0.28 टक्के साठा असून हा प्रकल्प कोरडाच असल्यासारखी स्थिती आहे. खडकुना प्रकल्पात 4.53 टक्के, महूपाडा 2.73 टक्के, शहादा तालुक्यातील दुधखेडा 11.07, खापरखेडा 3.96 टक्के, कोंढवळ 3.29, लोंढेरे 2.00 टक्के,  लंगडी भवानी 6.14 टक्के, शहाणे 2.55 टक्के, राणीपूर 19.09 टक्के तर उमराणी लघुपप्रकल्पपात फक्त 0.75 टक्के एवढाच पाणीसाठा आहे. यातील कोंढावळ, लोंढेरे व रोझवा या लघुसिंचन प्रकल्पांना गळती लागल्याने या प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे. एकंदरीत या सर्व लघुसिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा पाहता चिंतेचा विषय आहे. चिपळूण  तालुक्यात धरण फुटल्यानंतर  जळगाव येथील अधीक्षक अभियंता एस.जे. वंजारी व धुळे येथील कार्यकारी अभियंता एस.जी. शहापुरे यांनी भेट दिली. यातील काही प्रकल्पांना लागलेली गळती थांबविणे व जास्तीत जास्त पाणीसाठा होण्यासाठी प्रकल्पांमधील गाळ काढणे गरजेचे आहे. त्यासाठी  मात्र स्थानिक अधिका:यांनी लक्ष  देण्याची आवश्यकता असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला असून पावसाची अनियमितता पाहून हे प्रकल्प भरतील की नाही, अशी चिंता या प्रकल्प परिसरातील शेतक:यांना लागली आहे. तेव्हा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कसे भरतील यासाठी संबंधित विभागाच्या अधिका:यांनी बैठक घेऊन उपाययोजना आखण्याची गरज आहे. वर्षभरात या प्रकल्पांवर दुरुस्ती व इतर कामांच्या नावाखाली खर्च होतो. मात्र प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा का होत नाही याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेतक:यांकडून होत आहे.