नंदुरबार : मजुरीसाठी स्थलांतरीत झालेल्या मजुरांसह त्यांची मुलेही त्यांच्यासोबत गेल्याने ग्रामिण भागातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील उपस्थितीवर परिणाम झाला आहे. शिवाय विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या विविध शाळा केंद्रांतर्फे बालरक्षक टीम तयार करून विद्याथ्र्याना परत आणले जात आहे. पाडळदा बालरक्षक टीमने 13 विद्याथ्र्याना गुजरातमधून परत आणले. आता इतर शाळांमधील टीम देखील सरसावल्या आहेत.नंदुरबार जिल्ह्यातून मजुरीसाठी दरवर्षी हजारो मजूर कुटूंबे शेजारील गुजरात राज्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात स्थलांतरीत होतात. यंदा देखील अनेक कुटूंबे नोव्हेंबर महिन्यात स्थलांतरीत झाली आहेत. या कुटूंबांनी आपल्यासोबत आपल्या मुलांना देखील नेले आहे. यंदा देखील अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसोबत गेले आहेत. परिणामी शाळांमध्ये शुकशुकाट आहे.बालरक्षक टिम तयारपालकांसोबत गेलेल्या विद्याथ्र्याना शोधून परत आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने केंद्रशाळा स्तरावर बालरक्षक टीम तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार काही बालरक्षक टिम यांनी विद्याथ्र्याना शोधून परत आपल्या शाळेत परत आणले आहे.13 विद्यार्थी परतयाची सुरुवात पाडळदा केंद्राच्या बालरक्षक टीमने केली आहे. पाडळदा केंद्रातील बालरक्षक टीम ने गुजरातमधील नर्मदा साखर कारखाना धारखेडी, ता.राजपीपला येथे स्थलांतरीत झालेल्या कुटुंबांना शोधून काढले. तेथे 13 विद्यार्थी आढळून आल्याने त्यांच्या पालकांच्या संमतीने त्यांना परत आणण्यात आले. पहिलीच्या वर्गातील गुरुदास बन्सीलाल ठाकरे व विनायक ममराज पवार, दुसरी वर्गातील सागर पिनु ठाकरे, दुर्गा रमेश बागले, तिसरीचा सोमनाथ रमेश ठाकरे, चौथीची सावित्री कालु पाडवी, पाचवीचे सोमनाथ पिंटय़ा ठाकरे, विशाल बन्सीलाल ठाकरे, रेशन पिनु ठाकरे, मोनी पिंट्या ठाकरे, मिना दादला पाडवी, कुसुमवाडा शाळेतील तिस:या वर्गातील सोनिया नवनाथ पवार, उमरटी शाळेतील तिसरीच्या वर्गातील रोहीत पुना वळवी या विद्याथ्र्याचा समावेश आहे.साखर कारखान्यातील तेथील मुकादम गोकुळ पवार यांच्या मदतीने बालरक्षक टीममधील श्रीराम जी.शिरसाठ केंद्रप्रमूख पाडळदा, कुसुमवाडा शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव आव्हाड, उमरटीचे शिक्षक छगन माळी, कानडीचे शिक्षक मेरचंद राठोड, मोहिदातर्फे हवेली शाळेचे आझाद माळी, औरंगपूर शाळेचे हिवराळे यांचा समावेश होता.
बालरक्षक टीमने आणले 13 विद्यार्थी परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 11:10 IST