शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्वे आश्रमशाळेत ११ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह,आठवडाभर शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

शाळा व्यवस्थापनाने सुरुवातीला दोन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात ...

शाळा व्यवस्थापनाने सुरुवातीला दोन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. गेल्या रविवारी आलेल्या अहवालात पुन्हा नऊ विद्यार्थ्याना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्याचा अधिक प्रादुर्भाव पसरू नये म्हणून ही शाळा एक आठवडा बंद ठेवण्याची सूचना प्रकल्पधिकारी अविशांत पांडा यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावून सोमवारीच सर्व विद्यार्थ्याना घरी पाठविण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या अकरा विद्यार्थ्याना शाळेतच एका खोलीत विलगीकरण करण्यात आले असून, त्यांच्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र वैद्यकीय समुदाय अधिकारी पथक नियुक्त केले आहे. विद्यार्थ्यांना नियमित औषधे, व तपासणी केली जात असून विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असल्याचे माहिती वैद्यकीय सूत्रांनी सांगितली आहे. ग्रामपंचायतीने आश्रमशाळेची इमारत परिसरात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

व्यवस्थापन समितीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय

आश्रमशाळेत तब्बल ११ विद्यार्थी कोरोना संसर्गाचे आढळून आल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने शाळा व्यवस्थापन समितीची बैठक सोमवारी बोलवली होती. सदर बैठकीत व्यवस्थापन समितीचे सचिव तथा मुख्याध्यापक ए. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कळविले व दक्षता घेण्याबाबत सूूचना केल्या. कोरोनाचा अधिक संसर्ग इतर विद्यार्थ्यांमध्ये वाढू नये, म्हणून सदस्यांनी शाळा बंद ठेवण्याची सूचना मांडली. सोमवारपासून एक आठवडा शाळा बंद ठेवण्याच ठराव करण्यात आला. यावेळी बैठकीत अध्यक्ष संजय लालसिग पाडवी, उपाध्यक्ष संगीता लचेंद्र पाडवी, सहसचिव एच.एस. महाले, उंताबाई प्रताप पाडवी, भीमसिंग पाडवी, यशवंत वळवी, सर्जना वळवी, संगीता वळवी आदी उपस्थित होते.

तळोद्यात दुसऱ्या दिवशीही अँटिजेन टेस्टबाबत जनजागृती

तालुक्यातील कोरानाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाने व्यावसायिक, वाहन चालक व खासगी व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात अँटिजेन टेस्ट करण्यावर भर देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने देण्यात आले होते. दुसऱ्या दिवशीही तहसीलदार गिरीश वाखारे, मुख्याधिकारी सपना वसावे, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी व्यावसायिकांची कोरोना अँटिजेन टेस्ट करण्याबाबत जनजागृती केली असून शहरात तीन ठिकाणी पथक स्थापन केले आहे. त्यामुळे या टेस्टच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

नाला शासकीय आश्रमशाळेत कोरोना विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे त्याचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून एक आठवडा शाळा बंद ठेवण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली आहे.

अविशांत पांडा,प्रकल्पधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा.