शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १० डॉक्टरांना मालेगाव जाण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनासाठी मनुष्यबळाची गरज असताना जिल्ह्यात अ दर्जाचे १० वैद्यकीय अधिकारी मालेगाव येथे पाठवण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनासाठी मनुष्यबळाची गरज असताना जिल्ह्यात अ दर्जाचे १० वैद्यकीय अधिकारी मालेगाव येथे पाठवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे़ या निर्णयामुळे आरोग्य विभागात चर्चा सुरु झाली असून १० वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मालेगावी जाण्याबाबत अनुत्सुकता दर्शवली असल्याची माहिती आहे़मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना आरोग्य उपसंचालक यांच्याकडून पत्र प्राप्त झाले होते़ त्यानुसार त्यांनी शनिवारी १० जणांची नावे अंतिम करुन त्यांना मालेगाव येथे जाण्याचे पत्र दिले आहे़ यात डॉ़ संजीव सुरेश वळवी, डॉ़ प्रिती जयसिंग पटले, डॉ़ श्रीराम शामराव आडभाई, डॉ़ दिनेश शिवाजी रावताळे, डॉ़ सुरेश छगन देसाई, डॉ़ प्रविण लकडू चौरे, डॉ़ गणेश गोरोबा मैदाड, डॉ़ भिमसिंग विकला पावरा, डॉ़ राकेश झुंझार पावरा व डॉ़ शितलकुमार राम पाडवी यांचा समावेश आहे़ शासनाकडून लहान मुले असलेल्या महिला डॉक्टरांना मूळ आस्थापनेच्या ठिकाणी कर्तव्य बजावण्याची सूट देण्याबाबत सूचित करण्यात आले असताना यात एका महिला डॉक्टरचा समावेश करण्यात आला आहे़ जिल्ह्यात आधीच अ दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे़ सध्या हे सर्व वैद्यकीय अधिकारी जिल्हा आणि तालुकास्तरावर कोविड कक्ष किंवा क्वारंटाईन कक्षात सेवा देत आहेत़ दरम्यान सर्व वैद्यकीय अधिकाºयांना रविवारीच कार्यमुक्त करण्याचे आदेश काढून त्यांना तातडीने मालेगाव येथे रवाना होण्याचे आदेश देण्यात आलेल्या पत्रात करण्यात आले आहेत़