नांदेडमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 18:59 IST2019-06-19T18:58:02+5:302019-06-19T18:59:39+5:30
या प्रकरणी एका युवकास पोलिसांनी अटक केली आहे.

नांदेडमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन युवकाचा खून
नांदेड: पैशाच्या देवाण-घेवाणीतून एका २७ वर्षीय युवकाचा चाकूने वार करुन खून केल्याची घटना नांदेड शहरात मंगळवारी (दि. १८ ) मध्यरात्री घडली. या प्रकरणी एका युवकास पोलिसांनीअटक केली आहे.
शहरातील छत्रपती चौक भागातील नवजीवन नगर येथे १८ जूनच्या रात्री दहाच्या सुमारास संदीप श्रीरंग सदावर्ते व अन्य काही युवकांचे पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन भांडण झाले. याच भांडणातून संदीप सदावर्ते या युवकास चाकूने भोसकण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या संदीपचा या मारहाणीत मृत्यू झाला. मध्यरात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणात एका युवकाला अटक केली आहे. प्रदीप सदावर्ते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. के. डमाळे हे करीत आहेत.