महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:55 IST2019-05-09T00:55:26+5:302019-05-09T00:55:46+5:30
शहरातील ज्ञानेश्वरनगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ७ मे रोजी सकाळी घडली.

महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले
नांदेड : शहरातील ज्ञानेश्वरनगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ७ मे रोजी सकाळी घडली.
ज्ञानेश्वर येथील संजय भाऊराव कदम यांच्या पत्नी या आपल्या अंगणातील कचरा जमा करुन त्याची विल्हेवाट लावत असतानाच तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे गंठना हिसकावून पोबारा केला. दिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. शहरात सकाळी महिला फिरायला जातात. दुचाकीवरुन आलेले चोरटे त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकवण्याचे प्रकारही वाढले आहेत.
ज्ञानेश्वरनगर येथील घटनेप्रकरणी संजय कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.के. डमाळे हे करीत आहेत.
दरम्यान, उमरी येथील सिंधी येथे घडलेल्या एका घटनेत चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या घराचे कुलूप तोडून १५ हजार रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना ७ मे रोजी घडली. विशेष म्हणज,े सदर पोलीस अधिकारी हा उमरी ठाण्यातच कार्यरत आहे.
उमरी तालुक्यातील सिंधी येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तू बाबासाहेब मुंडे यांचा मुलगा डॉक्टर आहे. त्याच्या शासकीय निवासस्थानी चोरट्यांनी ७ मेच्या रात्री चोरी केली. या घटनेत घरातील एलसीडी, टीव्ही लंपास केला. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तू मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन उमरी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास जमदार अटकोरे यांच्याकडे दिला आहे.