महिलांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दक्षता घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:18 IST2021-03-10T04:18:50+5:302021-03-10T04:18:50+5:30
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे होते. भोसले म्हणाल्या की, दिवसेंदिवस स्त्रियांवरील अत्याचारात वाढ होत आहे १९८४ मध्ये ...

महिलांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दक्षता घ्यावी
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे होते. भोसले म्हणाल्या की, दिवसेंदिवस स्त्रियांवरील अत्याचारात वाढ होत आहे १९८४ मध्ये महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध आणण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र महिला कक्ष स्थापन करण्यात आला. मुंबईत असे ९ कक्ष असून महाराष्ट्रात १४४ कक्ष आहेत. आज सायबर क्राईममध्येही वाढ होत आहे. पैसे हस्तांतरण, कौटुंबिक व कर्तव्याच्या ठिकाणी छळ तसेच सोशल मीडियाचा वापर करून स्त्रीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करताना काळजी
रिक्वेस्ट स्वीकारतानाही पुरेपूर दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.अन्यथा सोशल मीडियावरील फोटोंचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यायला हवी. सूत्रसंचालन समन्वयक प्रा. डॉ. मंगल कदम यांनी तर आभार प्रा.डॉ.नीता जयस्वाल यांनी मानले.