महिलेची दागिन्यांची पर्स हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:58 IST2019-01-24T00:58:29+5:302019-01-24T00:58:46+5:30

शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालयासमोर रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातील ५७ हजारांचे दागिने असलेली पर्स चोरट्याने हिसकावून पळ काढला़ या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

The woman's jewelery handbag snapped out | महिलेची दागिन्यांची पर्स हिसकावली

महिलेची दागिन्यांची पर्स हिसकावली

नांदेड : शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालयासमोर रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातील ५७ हजारांचे दागिने असलेली पर्स चोरट्याने हिसकावून पळ काढला़ या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
सागरा रमेश जलावार (रा़विनायकनगर) या २१ जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास डी-मार्ट येथे खरेदी करुन बाहेर पडल्या होत्या़ त्यानंतर (एम़एच़२६, एऩ१३६०) या क्रमांकाच्या रिक्षातून त्या प्रवास करीत होत्या़ रिक्षा चांदोजी पावडे मंगल कार्यालयासमोर आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी जलावार यांच्या हातातील पर्स हिसकावून पळ काढला़ या दोघांनीही तोंडाला रुमाल बांधलेला होता़ जलावार यांच्या पर्समध्ये ५७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते़ यावेळी जलावार यांनी आरडाओरडही केली़ परंतु, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ तपास मपोउपनि एस़ आऱ कदम हे करीत आहेत़ गेल्या काही दिवसांत धूमस्टाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़

Web Title: The woman's jewelery handbag snapped out