शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

पाण्याची घागर पाच, कडबा २० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:50 IST

मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जांब बु.येथे जनावरांचा आठवडी बाजार मराठवाड्यात नावारुपाला आलेला आहे ; पण मागील चार वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे व अति- पाणीटंचाईमुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

ठळक मुद्देमुखेड तालुका : चारा पाण्याच्या धास्तीने जांब बु़ आठवडी बाजारात जनावरांची बेभाव किमतीत विक्री

जांब बु़ : मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जांब बु.येथे जनावरांचा आठवडी बाजार मराठवाड्यात नावारुपाला आलेला आहे ; पण मागील चार वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे व अति- पाणीटंचाईमुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आठवडी बाजारात पाणी ५ रुपये घागर तर कडबा १५ ते २० रुपयाला पेंढी मिळत आहे. चारा- पाण्याच्या धास्तीने शेतकरी आपले पशुधन बेभाव किमतीत विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.सध्या मागील चार वर्षांपासून तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला तर जांब बु़ मंडळात यावर्षी फक्त ५३६ मिमी पर्जन्यमान झाले़ सध्या मार्चमध्येच सर्व नदी, नाले, तलाव, विहिरी कोरडेठाक झाले असून पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.सतत चार वर्षांपासून दुष्काळामुळे शेती पिकेसुद्धा आले नाहीत व शेतात जनावरांचा चारा झाला नाही़ यामुळे चारा- पाण्याच्या भयानक संकटात बाजार सापडला असून शेतकऱ्यांना जनावरांना पाणी घेण्यासाठी एका घागरीसाठी ५ रुपये तर कडबा पेंढीसाठी १५ ते २० रुपये मोजावे लागतात़यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असून याकडे संबंधितांनी लक्ष देऊन सुविधा पुरविल्यास शेतकरी व व्यापाºयांची ससेहोलपट थांबेल़जांब बु़ येथे आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतून येतात मोठे व्यापारीमराठवाड्यातील नामवंत जनावरांच्या बाजारात पैकी जांब बु.येथील जनावरांचा आठवडी बाजार फारच प्रसिद्ध आहे. जांब बु. हे गाव १५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्येचे व १५ सदस्य ग्रामपंचायत असलेले जिल्ह्याच्या व तालुक्याच्या सीमावर्ती भागात वसलेले गाव. गावाच्या आजूबाजूला ३ किलोमीटर अंतरावर जळकोट तालुका (जि. लातूर) शिंदगी, वांजरवाडा ता.जळकोट दिग्रस, दापका राजा, होंडाळा, नागरजांब, पाखंडेवाडी, गाढवेवाडी, सावरगाव पी़, सांगवी बेनक, कामजळगा, वर्ताळा ही गावे अवतीभवती असून या ठिकाणी जनावरांच्या बाजारासाठी खरेदी-विक्री करण्यासाठी आंध्र प्रदेश व कर्नाटक मधूनसुद्धा मोठे व्यापारी जनावरे खरेदी करण्यासाठी येतात़ एवढा मोठा बाजार असूनही याठिकाणी कुठल्याही चांगल्या भौतिक सुविधा नसल्याने व्यापारी व शेतकºयांची ससेहोलपट होत आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळWaterपाणी