भरधाव खाजगी बसच्या धडकेत दुचाकीवरील काका-पुतण्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 14:26 IST2019-03-02T14:25:23+5:302019-03-02T14:26:26+5:30
एकजण जागीच ठार झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

भरधाव खाजगी बसच्या धडकेत दुचाकीवरील काका-पुतण्याचा मृत्यू
बिलोली (नांदेड ) : तालुक्यातील शंकरनगर येथे नांदेड-देगलुर मुख्यमार्गावरुन जाणाऱ्या एका दुचाकीस भरधाव खाजगी बसने धडक दिल्याने काका- पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. फेरोज बाबु सय्यद (१९ ) व हुशेन अमीरसाब सय्यद (५०) अशी मृतांची नावे आहेत.
नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील हुशेन अमीरसाब सय्यद हे आपला पुतण्या फेरोज बाबु सय्यद यास सकाळी 8 वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून (एम.एच.२६ बि.के.०९५६ ) शाळेत सोडण्यास जात होते. शंकरनगर येथे त्यांच्या दुचाकीला नांदेडकडून बीदरकडे जाणाऱ्या भरधाव खाजगी बसने धडक दिली. यात फेरोज याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या हुशेन यांचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पो.नि.बनसोडे हे करीत आहेत.