सासऱ्याने शिवीगाळ केल्याच्या रागातून स्वतःच्या मुलांना पेटविण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:32 IST2019-07-02T16:32:20+5:302019-07-02T16:32:55+5:30

बांधाच्या वादातून सासऱ्यासोबत झाला वाद

try to burn own children in land dispute with in-laws | सासऱ्याने शिवीगाळ केल्याच्या रागातून स्वतःच्या मुलांना पेटविण्याचा प्रयत्न 

सासऱ्याने शिवीगाळ केल्याच्या रागातून स्वतःच्या मुलांना पेटविण्याचा प्रयत्न 

नांदेड: शेतीतील धुऱ्याच्या वादाच्या कारणावरुन सासरे व त्यांच्या भावाशी झालेल्या वादानंतर पित्याने दोन मुलांच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लोहा तालुक्यातील पोलीसवाडी येथे १ जुलै रोजी घडली. या प्रकरणी लोहा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहा तालुक्यातील पोलीसवाडी येथील सोनी दत्ता हाके या महिलेस तिचा पती दत्ता हाके याने १ जुलै रोजी घरी येवून तुझ्या चुलत्याने मला धुऱ्याच्या कारणावरुन शिवीगाळ करीत मारहाण केली. आता मी  मुलांना जीवंत ठेवत नाही, असे म्हणून स्वत:च्या दोन्हीही मुलांच्या अंगावर रॉकेल ओतले. तसेच आगपेटी लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी पत्नी सोनी हाके यांनी आरडाओरड केली असता शेजारच्या मंडळींनी मुलांना वाचविले.  या प्रकरणी सोनी हाके यांच्या तक्रारीवरुन लोहा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दत्ता हाके याला अटक करुन न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.  या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गुलाब राठोड हे करीत आहेत.

Web Title: try to burn own children in land dispute with in-laws