शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

प्रकल्प आहेत, पाऊसही पडतो; दुष्काळ नियोजनाचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:37 IST

जिल्ह्यात मनार, बाभळी व विष्णूपुरीसारखे मोठे प्रकल्प आहेत़ पावसाचा विचार करता वरुणराजानेही नांदेडवर नेहमीच कृपादृष्टी दाखवलेली आहे़

ठळक मुद्दे३६५ टँकर अपेक्षित टंचाई कार्यक्रमांतर्गत विहीर अधिग्रहणांची प्रस्तावित संख्या १८२४

विशाल सोनटक्के ।नांदेड : जिल्ह्यात मनार, बाभळी व विष्णूपुरीसारखे मोठे प्रकल्प आहेत़ पावसाचा विचार करता वरुणराजानेही नांदेडवर नेहमीच कृपादृष्टी दाखवलेली आहे़ १७ वर्षांत केवळ दोनच वेळा जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला आहे़ मात्र, त्यानंतरही जिल्हावासियांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो़ उपाययोजनांवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होवूनही प्रशासनाच्या नियोजनाअभावी गावे तहानलेलीच दिसतात़२००२ ते २०१८ या १७ वर्षांतील पर्जन्यमानाचा अभ्यास केला असता, २०१४ साली ४५ टक्के तर २०१५ साली सरासरीच्या ४८़७५ टक्के पाऊस झाला होता़ ही दोन वर्षे वगळली तर जिल्ह्यात सातत्याने समाधानकारक पाऊस होवूनही वाड्या-वस्त्यावरील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीटंचाई कार्यक्रमांतर्गत यावर्षी विहीर अधिग्रहणांची प्रस्तावित संख्या १८२४ इतकी असून, पंचायत समितीस्तरावर ५९८ प्रस्ताव प्राप्त झाले असून सद्य:स्थितीत ६२८ हून अधिक विहिरींचे ४८६ गावे आणि ३२ वाड्यांवर अधिग्रहण करण्यात आले आहे़पाणी टँकरचा आकडाही असाच वाढत आहे़ प्रशासनाकडे टँकरची ३६५ संख्या प्रस्तावित असून यातील ५८ प्रस्ताव मंजूर झाले आहेत़ येत्या काळात टँकरची ही संख्या वाढण्याची शक्यता आहे़ तर दुसरीकडे टंचाई निवारणार्थ प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे़ यंदाच्या उन्हाळ्यातील उपयायोजनांची ही संख्या तब्बल ५ हजार २८१ वर पोहोचली आहे़ यातून १ हजार ३०५ गावे आणि ६४३ वाड्यांवर टंचाईकृती आराखड्यानुसार ६८२१.३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे़ सद्यस्थितीत विहीर अधिग्रहणाच्या २१६ कामांचे आदेश तहसिलदारांनी जारी केले आहेत़ याचबरोबर ३८ खाजगी तर नऊ शासकीय टँकर्सद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येते आहे़नांदेड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९५४ मि़मी़ इतके आहे़ मागील १७ पैकी १५ वर्षांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असून २००५ मध्ये तर सरासरीहून अधिक म्हणजे १३२ मि़मी़ पाऊस नोंदविला गेला़ २०१० मध्ये १०९ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ तर २०१६ या वर्षात जिल्ह्यात सरासरीहून अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस झाला़ एकूणच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे़ दुसरीकडे, जिल्ह्यात मनार, बाभळी, विष्णूपुरी, उर्ध्व पैनगंगा, सुधा, कुंद्राळा, हणेगाव यासारखे मोठे प्रकल्पही उपलब्ध आहेत़ मात्र त्यानंतरही दरवर्षी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे़ त्यामुळेच पाणीटंचाई निवारणार्थ दरवर्षी होणारा कोट्यवधीचा निधी नेमका जातो कुठे? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे़दरवर्षी होते विशेष नळ अन् विहीर दुरुस्तीपाणीटंचाई निवारणार्थ दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो़ जिल्हा परिषदेने घेतलेल्या टंचाई उपाययोजनांची माहिती घेतली असता, २००२ ते २०१८ या १६ वर्षांत प्रशासनाच्या वतीने ६८५ तात्पुरत्या पुरक नळ योजना उभारण्यात आल्या़ याच काळात १७३३ नळयोजनांची विशेष दुरुस्तीही करण्यात आली, हीच बाब विंधन विहिरीसंदर्भात. प्रशासनाने मागील १६ वर्षांत जिल्ह्यात विविध ठिकाणी ४ हजार ७९९ विंधन विहिरी घेतल्या़ तर विंधन विहिरीच्या दुरुस्तीची पंधरा वर्षांत तब्बल १५ हजार २४२ कामे केली़ तात्पुरत्या योजना या टंचाईच्या अनुषंगाने तात्पुरती मलमपट्टी ठरत आहेत़ त्यामुळेच दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्चूनही वाड्या-वस्त्या तहानलेल्याच असल्याचे चित्र आहे़१४६४ कामे प्रगतीपथावरयंदा पाणी टंचाई निवारणार्थ १८३४ उपाययोजनांना प्रशासनाने मंजुरी दिली असून यावर ७२०़१३ लाखांचा खर्च झाला आहे़ तर १४६४ उपाययोजनांची कामे प्रगतीपथावर असून या कामांसाठी २७४़२३ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे़ तर ९२४ उपाययोजना प्रशासनाने टंचाई निवारणार्थ पूर्ण केल्या असून यामुळे ५११ गावे आणि ६६ वाड्यांना दिलासा मिळाला आहे़ या उपाययोजनांसाठी १९४़३८ लाखांचा खर्च करण्यात आला आहे़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरणDamधरण