शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलाचा करुण अंत! संसार मोडून एकत्र आले, पण समाज विरोधाला कंटाळून जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:00 IST

शेजाऱ्यांमध्ये प्रेम फुलले, संसार मोडून एकत्र राहिले; वर्षभरानंतर गावी परताच नातेवाईक, समाजाचा विरोध वाढल्याने प्रेमीयुगुलाचा टोकाचा निर्णय

हदगाव (नांदेड): 'प्यार किया तो डरना क्या' म्हणत संसार आणि मुलांना सोडून पळून गेलेल्या एका विवाहित प्रेमीयुगुलाचा प्रवास अत्यंत दु:खद पद्धतीने संपुष्टात आला. गावातील व नातेवाईकांचा विरोध तीव्र झाल्याने त्यांनी बामणीफाटा येथील शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या दोघांचाही ६ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नेमके काय आहे प्रकरण?हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील रहिवासी असलेले गजानन केरबा गव्हाळे (वय ३५, व्यवसाय चालक) आणि उमा बालाजी कपाटे (वय २८) हे दोघेही विवाहित होते आणि त्यांना प्रत्येकी तीन अपत्ये होती. एकमेकांचे शेजारी असल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. मात्र, दोघांचेही संसार सुखाचे सुरू असतानाही त्यांनी समाजाला आणि कुटुंबाला झुगारून १९ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलांना टाकून पलायन केले. जवळपास एक वर्षभर दोघेही एकत्र राहिले. परंतु, प्रेमाची नशा उतरल्यावर त्यांना कुटुंबाची आणि गावाची आठवण झाली. दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी हे दोघेही गावी चिंचगव्हाण येथे परतले.

गावात तीव्र विरोध, टोकाचे पाऊलगावी परत येताच त्यांना नातेवाईकांचा आणि समाजात तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. विशेषतः, गजाननच्या पत्नीने त्यांना घरात घेण्यास स्पष्ट नकार दिला. समाजाच्या या विरोधामुळे आणि अवहेलना सहन न झाल्याने, दोघांनीही बाईकवरून गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बामणीफाटा येथील एका पेट्रोल पंपावर बाईक सोडून जवळच्या शेतात विषारी औषध प्राशन केले. विषारी औषध प्राशन केल्याची माहिती गावातील काही तरुणांना मिळताच त्यांनी दोघांना तात्काळ हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु दुसऱ्या दिवशी, ६ ऑक्टोबर रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आई-वडील आणि ६ अपत्यांना सोडून गेले!या घटनेमुळे चिंचगव्हाण गावावर आणि दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे, या दोघांनाही मिळून सहा अपत्ये आहेत. या आत्महत्येमुळे सहा निष्पाप मुलांचे छत्र हरवले आहे. रात्री उशिरा या दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या कृत्यामुळे मुलीकडील नातेवाईक इतके नाराज होते की, ते अंत्यविधीसाठीही आले नाहीत. या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lovers' Tragic End: Eloped, Faced Opposition, Ended Their Lives

Web Summary : Married lovers, facing societal disapproval after eloping and abandoning their families, committed suicide in Hingoli. They were discovered in a field after consuming poison, later dying in hospital, leaving six children orphaned.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूNandedनांदेड