वडिलांनी तलावात जाणे टाळले, मुलगा मित्रांसोबत गेला अन् जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 18:50 IST2022-06-11T18:50:01+5:302022-06-11T18:50:13+5:30

तलावात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू 

The father avoided going to the lake, the son went with his friends and lost his life | वडिलांनी तलावात जाणे टाळले, मुलगा मित्रांसोबत गेला अन् जीव गमावला

वडिलांनी तलावात जाणे टाळले, मुलगा मित्रांसोबत गेला अन् जीव गमावला

मुखेड ( जि.नांदेड ):  जुन्ना पाझर तलावात मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या एका १३ वर्षीय मुलाचा आज दुपारी बुडून मृत्यू झाला. चंद्रकांत माधव चोपवाड असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे मृताचे वडील याच तलावात मासेमारी करतात. त्यांनी आज तलावात जाणे टाळले. मात्र, मुलगा मित्रांसोबत गेला अन जीव गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

मुखेड शहरापासुन ३ किमी अंतरावर जुन्ना पाझर तलाव आहे. आज दुपारी चंद्रकांत माधव चोपवाड ( १३ ) मित्रांसोबत तलावात पोहायला गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. चंद्रकांत बुडाल्याचे दिसताच त्याच्यासोबतच्या मित्रांनी तेथून पळ काढला. हे दृश्य तलावावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांना दिसले असता त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. 

प्रणीत कांबळे यांनी चंद्रकांत बुडाल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, पोलिस उपनिरिक्षक गजानन काळे, गजानन अन्सापुरे, पोलिस नाईक गंगाधर चिंचोरे, पोलिस अंमलदार किरण वाघमारे, बळीराम सूर्यवंशी, शिवाजी आडबे यांनी तलावावर धाव घेतली. पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या काही युवकांच्या मदतीने चंद्रकांतला पाण्या बाहेर काढले. मात्र,त्याचा मृत्यू झाला होता. मृताच्या पश्चात आईवडील तीन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: The father avoided going to the lake, the son went with his friends and lost his life