शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या लग्नाचा मुहूर्त काढला, तयारी सुरू केली अन् पण काळाने बापाचे छत्र हिरावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:31 IST

बिलोली तालुक्यातील आरळी येथील या घटनेने संपूर्ण गाव हळहळले आहे.

राहेर (नांदेड) : घरात लगीनघाई, कुटुंबातला कनिष्ठ मुलगा लग्नाच्या बोहल्यावर चढणार, घरात कमालीचा उत्साह, लग्नाच्या पत्रिकांची छपाई, वधू-वरांची कपड्यांची खरेदी अन् लग्नाचे कार्यस्थळ निश्चित करत लग्नाची तयारी करणाऱ्या कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले. नवरदेव संदीपचा बाप हृदयविकाराच्या धक्क्याने काळाने हिरावून नेला. बिलोली तालुक्यातील आरळी येथील या घटनेने संपूर्ण गाव हळहळले आहे.

आरळी येथील सेवानिवृत्त वनमजुर मारोती सिद्राम इबत्तेवार (६२) हे मुलाच्या लग्नाची जय्यत तयारी करताना २५ एप्रिल रोजी रात्री इमारतीच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले, अन् शनिवार रोजी सकाळी सहादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाले. वृद्ध आईने आपला मुलगा मारोती गच्चीवरून खाली का येत नाही म्हणून त्याला उठवण्यासाठी गच्चीवर गेली. तो उठत नसल्याचे पाहून कांगावा केला अन् लगीनघाई असलेल्या या घरात दुःखाने संचार केला. सर्व कुटुंब शोकसागरात बुडाले. 

मुलाचे लग्न पाहण्याचा योग नशिबी नव्हतावडील मारोती यांनी आपल्या मुलाचे लग्न धूमधडाक्यात लावण्यासाठी १४ मे चा मुहूर्त काढून, लग्न मंडप, आचारी, वधू-वरांचे कपडे, पत्रिकांची छपाई करत मुलाचे दोनाचे चार हात करण्याचे स्वप्न पाहिले. गावातील नातेवाईक, मित्र परिवारांना लग्नासाठी आमंत्रित करू लागले; पण दैव जाणिले कुणी म्हटल्याप्रमाणे मुलाचे लग्न पाहण्याचाच योग त्यांच्या नशिबी नव्हता. मयत मारोती इबत्तेवार यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी सातच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भाऊजयी, पत्नी, दोन मुले, सून व नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न