भीषण अपघात ! लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक उलटून तिघांचा मृत्यू, १० जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 14:04 IST2021-06-15T14:03:51+5:302021-06-15T14:04:22+5:30
समोरच्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

भीषण अपघात ! लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक उलटून तिघांचा मृत्यू, १० जखमी
मुखेड ( नांदेड ) : तालुक्यातील सलगरा बु.गावाजवळ सकाळी १० वाजेच्या सुमारास लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक उलटून भीषण अपघात झाला. यात तिघे ठार झाले असून १० ते १२ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. समोरच्या वाहनाला धड्केपासून वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील हाळी येथील वऱ्हाड बिलोली तालुक्यात लग्नासाठी सकाळी निघाले होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास मुखेड तालुक्यातील सलगरा बु. गावाजवळ समोरून आलेल्या वाहनासोबत धडक होण्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे काही कळायच्या आता ट्रक रस्त्याच्या खाली उतरून उलटला. यात एक तरुण जागीच ठार झाला. तर उपचारास नेत असताना दोघांचा मृत्यू झाला. काही जखमींवर मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहेत.