सुधा नदीच्या पुलावर भीषण अपघात, भरधाव व्हॅन-दुचाकीच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 12:35 IST2023-12-01T12:34:53+5:302023-12-01T12:35:09+5:30

भोकरच्या सुधा प्रकल्पाजवळील घटना 

Terrible accident on Sudha river bridge, father and son died on the spot in collision between speeding van and two-wheeler | सुधा नदीच्या पुलावर भीषण अपघात, भरधाव व्हॅन-दुचाकीच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू

सुधा नदीच्या पुलावर भीषण अपघात, भरधाव व्हॅन-दुचाकीच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू

भोकर : येथील हिमायतनगर रस्त्यावरील सुधा नदीच्या पुलाजवळ व्हॅन आणि दुचाकीची जबर धडक झाली. यात दुचाकीवरील पिता - पुत्र जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. 

भोकर पासून ३ किमी अंतरावरील सुधा प्रकल्पाजवळील वळण रस्त्यावर दुचाकीवरून (क्र. एमएच २६ सीसी १३३०) शंकर अप्पा राठोड (वय ५०) व लखन शंकर राठोड (वय २८, दोघे रा. कुंचलीतांडा, नायगाव) हे दोघे कामगार पिता - पुत्र दुचाकीवरून हिमायतनगरकडे जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या भरधाव व्हॅनने (क्र. टिएस ०९ युडी ४०४६) दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. धडक इतकी जबर होती की, दुचाकीचा चेंदामेंदा झाला असून, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.

Web Title: Terrible accident on Sudha river bridge, father and son died on the spot in collision between speeding van and two-wheeler