अर्धापुरात तहसीलदारांच्या गाडीचा भीषण अपघात! दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रॅक्टरने दिली धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:12 IST2026-01-30T15:08:52+5:302026-01-30T15:12:11+5:30

या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यासह त्यांचे कर्मचारी जखमी झाले आहेत.

Terrible accident involving tehsildar's car in Ardhapura! A tractor hit a two-wheeler while trying to save it | अर्धापुरात तहसीलदारांच्या गाडीचा भीषण अपघात! दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रॅक्टरने दिली धडक

अर्धापुरात तहसीलदारांच्या गाडीचा भीषण अपघात! दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रॅक्टरने दिली धडक

- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड):
अर्धापूर शहरात आज तहसीलदारांच्या शासकीय वाहनाचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यासह त्यांचे कर्मचारी जखमी झाले आहेत. सुदैवाने, या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी तहसीलदारांचे शासकीय वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले आहे.

नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून एक ट्रॅक्टर जात असताना त्याच्यासमोर अचानक एक दुचाकी आली. या दुचाकीस्वाराचा जीव वाचवण्यासाठी ट्रॅक्टर चालकाने अचानक वळण घेतले. मात्र, वेगामुळे ट्रॅक्टरचा दुभाजकाला धक्का लागला आणि चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेला ट्रॅक्टर विरुद्ध दिशेला गेला आणि त्याच वेळी समोरून येणाऱ्या तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या शासकीय वाहनावर जोरात धडकला.

नागरिकांचे तातडीचे मदतकार्य
या अपघातात गाडीतील सेवक शेख सलीम यांचा पाय फॅक्चर झाला असून तहसीलदार देवणीकर आणि चालक अरुण वाघमारे हे देखील जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. आनंद शिंदे, सापोनी विष्णुपंत कराळे यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी जखमींना तातडीने गाडीबाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, अर्धापूर येथे दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू असून तहसीलदार देवणीकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title : अर्धापुर में तहसीलदार की गाड़ी दुर्घटनाग्रस्त; बाइक सवार को बचाते समय ट्रैक्टर ने मारी टक्कर।

Web Summary : अर्धापुर में एक ट्रैक्टर ने मोटरसाइकिल से बचने की कोशिश में तहसीलदार की गाड़ी को टक्कर मार दी। तहसीलदार और कर्मचारी घायल हो गए। स्थानीय लोगों और पुलिस ने मदद की; सभी का इलाज चल रहा है।

Web Title : Tehsildar's vehicle crashes in Ardhapur; tractor hits while saving biker.

Web Summary : In Ardhapur, a tractor collided with the Tehsildar's vehicle while trying to avoid a motorcycle. The Tehsildar and staff sustained injuries. Locals and police assisted; all are receiving treatment.