निवडणुकीत अपात्र ठरण्याच्या भितीने तिसऱ्या अपत्याला संपवले, जन्मदात्याचे धक्कादायक कृत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:31 IST2026-02-03T11:25:46+5:302026-02-03T11:31:01+5:30
तिसरे अपत्य निवडणुकीत अडसर ठरत असल्याने पित्याने पोटच्या ७ वर्षीय चिमुकलीस संपविल्याची घटना उघडकीस आली.

निवडणुकीत अपात्र ठरण्याच्या भितीने तिसऱ्या अपत्याला संपवले, जन्मदात्याचे धक्कादायक कृत्य!
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : तिसरे अपत्य निवडणुकीत अडसर ठरत असल्याने पित्याने पोटच्या ७ वर्षीय चिमुकलीस संपविल्याची घटना उघडकीस आली. आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली आरोपीने दिली होती मात्र, यामागे निवडणुकीचे कारण असून, कटात आरोपीची पत्नी व सरपंच हेही सहभागी असल्याची बाब समोर आली आहे.
यातील आरोपी पांडुरंग बाबूराव कोंडामंगले (वय ३२, रा. केरूर) याने २९ जानेवारी रोजी मुलगी प्राची हीस दुपारी दुचाकीवर बसवून नेत तेलंगणातील यडपल्ली येथील रस्त्यालगत असलेल्या कॅनॉलमध्ये फेकून दिले. स्थानिकांनी मृत्यू पावलेल्या मुलीस पाण्याबाहेर काढून पोलिसांना कळविले. मुखेड पोलिसांनी पांडुरंग यास चौकशीसाठी बोलावले असता ‘मी आर्थिक विवंचनेत असल्याने मी काय केले हे मला माहीत नसल्याची बतावणी केली.’ तेलंगणा (यडपल्ली) पोलिसांनी त्याच्या पत्नीस पाचारण केले असता खुनाचा प्रकार समोर आला आहे.