शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

झटपट श्रीमंत होण्याचा नाद शिक्षकाच्या जिवावर बेतला; बनावट नोटांनी हत्या प्रकरणाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:49 IST

चिखली पोलीस आता या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्यांनी यापूर्वी कोणाकोणाला लुटले आहे, याचा तपास करत आहेत.

हदगाव (नांदेड): हदगाव येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक गणेश गड्डा (३८ ) यांच्या हत्या प्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात गेलेल्या या शिक्षकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुलढाणा येथील चिखली येथे उघडकीस आली आहे. चिखली पोलिसांनी या प्रकरणात खामगाव येथील दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटांमुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

'चिल्ड्रन बँक'च्या नोटांचे गौडबंगालशेख शाहरुख शेख प्यारु (वय ३१ वर्षे) व सुप्रबुद्ध महादेव हिवराळे (वय ३३ वर्षे, दोन्ही रा. बोथाकाजी, ता. खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या कारमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' छापलेल्या नोटांचे पुडके आढळून आले आहेत. यावरून ही टोळी बनावट नोटांचे आमिष दाखवून किंवा नोटा दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने लोकांना लुटणारी एक मोठी टोळी असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींनी गड्डा यांना हेच आमिष दाखवून चिखलीला बोलावले होते.

चालत्या कारमधून फरफटत नेलेगणेश गड्डा हे उंचेगाव येथील भाड्याची कार घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे मोठी रक्कम घेऊन गेले होते. विशिष्ट रक्कम दिल्याने दुप्पट रक्कम करून देतो असे त्यांना सांगण्यात आले होते. चिखली येथे आरोपींनी गड्डा यांना त्यांच्या कारमध्ये घेतले. व्यवहार सुरू असताना आरोपींनी कारमध्येच गड्डा यांच्याकडील खरी रोकड हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. गड्डा यांनी त्याला तीव्र प्रतिकार केला असता, आरोपींनी त्यांच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. इतकेच नव्हे, तर जखमी अवस्थेत असलेल्या गड्डा यांना आरोपींनी चालत्या कारमधून काही अंतरापर्यंत फरफटत नेऊन रस्त्यावर फेकून दिले. या गंभीर दुखापतीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

कार चालकाचे 'प्रसंगवधान' अन् आरोपी अटकेतया प्रकरणात सुरुवातीला संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या हदगावच्या कार चालकाला पोलिसांनी निर्दोष मुक्त केले आहे. अनिल शिंदे असे या चालकाचे नाव असून, त्याने केवळ भाड्याने गाडी दिली होती. त्याने पळून जाणाऱ्या आरोपींच्या गाडीचा क्रमांक टिपून घेतला आणि तात्काळ नातेवाईकांना माहिती दिली, ज्यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणे सोपे झाले. कॉल डिटेल्सवरूनही त्याचा या कटाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

असे सापडले आरोपी, बनावट नोटा जप्तचालकाने दिलेल्या कारच्या क्रमांकाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली. एका ठिकाणी पोलिसांना संशयित कार समोरून येताना दिसली. पोलिसांनी गाडी अडवली आणि त्यातील दोघांना ताब्यात घेतले. शेख शाहरुख शेख प्यारु (वय ३१ वर्षे) व सुप्रबुद्ध महादेव हिवराळे (वय ३३ वर्षे, दोन्ही रा. बोथाकाजी, ता. खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, पैसे दुप्पट करण्याच्या लालसेपोटी सुशिक्षित लोकही अशा रॅकेटला बळी पडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Teacher's get-rich-quick scheme leads to murder; fake notes twist case.

Web Summary : A teacher's murder in Hadgaon is linked to fake currency. Two individuals are arrested in Chikhli with counterfeit notes and the car used in the crime. The victim was lured with promises of doubling his money. Police suspect a larger fake currency racket.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडfraudधोकेबाजी