शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

मतदानाद्वारे दगाबाज भाजपाला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:22 IST

अशा दगाबाज पक्षाला धडा शिकविण्याची संधी पालिका निवडणुकांच्या माध्यमातून लोहावासियांना मिळाली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणा-या भाजपाला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देविराट सभाअशोकराव चव्हाण यांचे आवाहन

नांदेड : केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. समाजातील सर्वच घटकाला या सरकारने दगा देण्याचे काम केले आहे. अशा दगाबाज पक्षाला धडा शिकविण्याची संधी पालिका निवडणुकांच्या माध्यमातून लोहावासियांना मिळाली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणा-या भाजपाला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.लोहा नगरपालिका निवडणुकीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भटक्या विमुक्त जाती महासंघ आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ येथील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. व्यासपिठावर माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, माजी मंत्री आ.डी.पी. सावंत, युवानेते धीरज देशमुख, माजी मंत्री आ.बस्वराज पाटील, आ.वसंतराव चव्हाण, आ.अमरनाथ राजुरकर, महापौर शीलताई भवरे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रदेश सरचिटणीस बी.आर. कदम, माजी आ.रोहिदास चव्हाण, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.रावसाहेब अंतापूरकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, उपमहापौर विनय गिरडे पाटील, सभापती शमीम अब्दुल्ला, माजी महापौर अब्दुल सत्तार, तालुकाध्यक्ष माधवराव पांडागळे, रंगनाथ भुजबळ, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, कल्याण सूर्यवंशी, माजी सभापती किशोर स्वामी, माजी सभापती संजय बेळगे, संजय देशमुख लहानकर, आनंद चव्हाण, विजय येवनकर, प्रशांत तिडके आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना खा.अशोकराव चव्हाण म्हणाले की, जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने सध्या मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढत आहे. या सरकारने जनतेला वा-यावर सोडले आहे. त्यामुळे अच्छे दिनचे स्वप्न दाखविलेल्या भाजपाच्या काळात जनतेसाठी बुरे दिन आले आहेत. पण काळजी करू नका , येणारे सरकार काँग्रेस पक्षाचेच राहणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून महाराष्टभर फिरत असताना वारे काँग्रेसच्या दिशेने वाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येणा-या काळात महाराष्ट्राबरोबरच केंद्रातील सरकारही काँग्रेसचेच येणार आहे. त्यामुळे उद्या सर्वांगीन विकासासाठी लोहावासियांनी काँग्रेसच्या पाठीशी रहावे, आवाहन खा. चव्हाण यांनी केले.नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा लोहा आणि कंधारची परिस्थिती वेगळी आहे. निष्ठा आणि विश्वास कशाला म्हणतात? हेच काहींना माहित नाही. अशा व्यक्ती या कधीच एका पक्षासोबत राहिलेल्या नाहीत. अशा दलबदलू लोकांना जागा दाखवून देण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना मिळाली आहे. केवळ लोहा नगरपालिकाच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणूक आणि लातूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी पूर्ण ताकतीने काँग्रेससोबत रहा, असे आवाहनही त्यांनी केले.माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, माजी मंत्री आ.डी.पी. सावंत, युवानेते धीरज देशमुख, माजी मंत्री आ.बस्वराज पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली.प्रारंभी सभेचे प्रास्ताविक नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनू संगेवार यांनी केले तर सुत्रसंचालन आणि आभार प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले. यावेळी माजी सभापती मसुद खान, उमेश पवळे, सुनिल शेट्टे, बालाजी पांडागळे, संजय मोरे, राजू काळे, श्रीनिवास जाधव, फारूखअली खान, साबेर चाऊस यांची उपस्थिती होती.पुढील सर्व निवडणुकात भाजपचे पाणीपतकंधार-लोहा तालुक्यातील कामधेनु असलेला कलंबर सहकारी साखर कारखाना कोणी बंद पाडला? चंद्रपूर जिल्ह्यातील बंद पडलेली दारूची दुकाने नांदेड जिल्ह्यात कोणी सुरू केली? याची माहिती तुम्हा सर्व मतदारांना आहे. देशी दारूची दुकाने चालविण्याइतके सोपे काम साखर कारखाने चालविण्याचे नाही. त्यामुळे अशा नेत्यांना जनताच जागा दाखवून देईल. असे सांगतानाच शेतक-यांना स्वत:च चिता रचून त्यावर पेटवून घेवून आत्महत्या हत्या करण्याची वेळ या सरकारने आणली आहे. त्यामुळे आता हे सरकार घालविण्याचे काम लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीतून तुम्ही करावे. देशात ज्या पाच राज्यांत आता निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपाचे पाणीपत दिसत आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोह्यात करा असेही ते म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा