सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ‘बाभळी’ बंधा-याचे दरवाजे आज बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:53 PM2017-10-28T16:53:16+5:302017-10-28T16:58:21+5:30

नांदेड जिल्ह्यातील धमार्बाद तालुक्यातील बाभळी बंधा-याचे १४ दरवाजे २९ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ञिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बंद करण्यात येणार आहे.

As per the Supreme Court order, the doors of 'Babhali' dam will be closed today | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ‘बाभळी’ बंधा-याचे दरवाजे आज बंद होणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ‘बाभळी’ बंधा-याचे दरवाजे आज बंद होणार

googlenewsNext
ठळक मुद्देबंधारा पुर्ण व उदघाटन होऊन चार वर्ष उलटुनही हरितक्रांतीचे स्वप्न अपुर्णचदोनच सुरक्षारक्षकावर बंधा-याची सुरक्षा बंधा-याच्या ठिकाणी वर्षभरापासुन लाईटची सोय नाही,बंधा-याकडे जाणारा रस्ताही उखडला

धमार्बाद (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्यातील धमार्बाद तालुक्यातील बाभळी बंधा-याचे १४ दरवाजे २९ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ञिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बंद करण्यात येणार आहे. या बंधा-यात सध्यस्थितीत १.३६२ दशलक्ष घनमीटर अथवा अडीच मिटर  एवढा उपलब्ध पाणी साठा अडविण्यात येणार आहे. 

देशभरात गाजलेल्या महाराष्ट्र व तेलगंणा राज्यातील बहुचर्चित बाभळी बंधा-याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार बंधा-याचे  दरवाजे दरवर्षी १ जुलै ते २८ आॅक्टोबर या पावसाळ्याच्या कालावधीत उघडे राहतील व २९ आँक्टोबर ते ३० जूनपर्यंत दरवाजे बंद राहतील. या कालावधीत उपलब्ध असलेल्या जलसाठ्यापैकी १ मार्च रोजी ०.६  टिएमसी पाणी तेलगंणा राज्यात सोडण्यात यावे असा निकाल दिला. त्यानुसार याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात येत आहे.त्यानुसार  २९ आॅक्टोबर रोजी बंधा-याचे दरवाजे बंद करून उपलब्ध १.३६२ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा अडविण्यात येणार आहे.

बाभळी बंधारा होऊन व त्याचे उदघाटन २९ आॅक्टोबर २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बंधा-यात जलसाठा उपलब्ध होता पण त्यानंतर गेल्या चार वर्षात अल्प पाऊस असल्याने कोरडेच दरवाजे बंद उघडणे होते.  यावर्षी समाधानकारक पाऊस व जायकवाडी व विष्णुपुरी धरणातुन पाणी गोदावरी नदीपात्रात सोडल्यामुळे बाभळी बंधा-यात पाणीसाठा उपलब्ध आहे. 

दरम्यान, बाभळी बंधा-यातील उपलब्ध पाणीसाठ्याचे महाराष्ट्र शासन योग्य नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळे परिसरातील शेतक-यांची जवळपास ८000 हेक्टर शेती सिंचनाखाली येऊन हरितक्रांती होण्याचे स्वप्न सध्या तरी स्वप्नच राहीले आहे. याचबरोबर गेल्या अनेक वषार्पासुन बंद अवस्थेतील  १२ जलसिंचन प्रकल्प (लिफ्ट इरिगेशन)  सुरू केल्यास त्याचा फायदा शेतक-यांना मिळणार आहे. याकडे सुद्धा शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आघाडी सरकारने व आताच्या भाजपा सरकारने बाभळी पाणीप्रश्नी अद्याप पुनर्याचिका दाखल केली नाही, म्हणून दरवर्षी आॅक्टोबरअखेरपर्यंत बंधा-याचे दरवाजे उघडे ठेवावे लागत आहे़ परिणामी पाण्याचा उपयोग होत नाही. दहा टक्के शेतकरी या पाण्याचा वापर करत नाही बारा जलसिचंन प्रकल्प सुरु करणे गरजेचे आहे असे मत बाभळी बंधारा कृती समितीचे सचिव डॉ.प्रा.बालाजी कोंम्पलवार यांनी लोकमतला माहिती दिली.  

बंधा-याची सुरक्षितता वा-यावर....
महाराष्ट्र व तेलगंणा राज्यात बाभळी बंधारा निर्मितीपासुन वाद असताना  बंधा-याच्या सुरक्षिततेबद्दल महाराष्ट्र शासन उदासीन आहे.दोनच सुरक्षारक्षकावर बंधा-याची सुरक्षा असल्याने या निमित्ताने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या एक वर्ष भरापासुन बंधारा व परिसरात विद्युतची सोय नसल्यामुळे जवळपास ७० ते ८० विद्युत दिवे बंद अवस्थेत आहेत.त्यामुळे बंधारा परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाकडुन दरवाजे बंद करणे व उघडण्याच्या तारखेच्या वेळी विद्युत ची सोय केली जाते.  बाभळी बंधारा पूर्ण होऊन व त्याचे उदघाटन होऊन चार वर्षांचा कालावधी संपला. बंधा-यात पाणी अडविणे व सोडून देणे हा एक कलमी कार्यक्रम महाराष्ट्र सरकार करीत आहे. 

बंधा-याकडे जाणा-या रस्त्याची दुर्दशा

बाभळी बंधा-याकडे जाण्यासाठी बाभळी गावापासुन ते बाभळी बंधारा पर्यंत रस्ता बनविण्यात आला. त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असुन रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे- झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे ये-जा करणा-यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

बाभळी बंधारा बचाव कृती समितीचे सचिव डाँ.प्रा.बालाजी कोंपलवार यांनी महाराष्ट्र शासनाने बंधा-याचे दरवाजे लावण्याच्या तारखा बदलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका लवकरात लवकर दाखल करावी अशी मागणी केली. सध्या बाभळी बंधारा परिसरात १.३६२ दशलक्ष घनमीटर म्हणजे .०४८ टीएमसी एवढा जलसाठा उपलब्ध असल्याची माहीती नांदेड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रशांत कदम करखेलीकर यांनी दिली.
१.३६२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सध्या बंधा-यात शिल्लक.

Web Title: As per the Supreme Court order, the doors of 'Babhali' dam will be closed today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.