नांदेड परिक्षेत्राच्या महानिरीक्षकपदी सुहास वारके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:49 IST2018-05-31T00:49:03+5:302018-05-31T00:49:03+5:30

नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी डॉ़सुहास वारके यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे़ बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले़

Suhas Warke as Nanded Director General | नांदेड परिक्षेत्राच्या महानिरीक्षकपदी सुहास वारके

नांदेड परिक्षेत्राच्या महानिरीक्षकपदी सुहास वारके

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी डॉ़सुहास वारके यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे़ बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले़
दोन दिवसांपूर्वीच नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबाद येथे पोलीस आयुक्तपदी बदली झाली़ त्यामुळे नांदेडच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी कोण येणार, याबाबत परिक्षेत्रात उत्सुकता होती़ नांदेडला यापूर्वी पोलीस अधीक्षक राहिलेले विठ्ठल जाधव यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती़ त्यात बुधवारी डॉ़ सुहास वारके यांच्या नियुक्तीचे आदेश धडकले़
डॉ़सुहास वारके हे प्रशिक्षणार्थी असताना त्यांनी नांदेडला काम पाहिले आहे़ त्यानंतर नांदेडलाच अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे़ त्यात आता पदोन्नतीने त्यांना पुन्हा एकदा नांदेडला नियुक्ती देण्यात आली आहे़ लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत़

Web Title: Suhas Warke as Nanded Director General