शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सत्ताधारी पायउतार होईपर्यंत संघर्ष सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:40 IST

केंद्र व राज्य सरकारने मागील साडेचार वर्षांत जनतेला विकासाच्या नावावर केवळ भूलथापा दिल्या़ लोकांचे हित व हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काँग्रेसने राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून सत्ताधारी पायउतार होइपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे

ठळक मुद्देभोकर येथे जनसंघर्ष यात्रा : अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : केंद्र व राज्य सरकारने मागील साडेचार वर्षांत जनतेला विकासाच्या नावावर केवळ भूलथापा दिल्या़ लोकांचे हित व हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काँग्रेसने राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून सत्ताधारी पायउतार होइपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण केले़ शहरातील मोंढा मैदानात काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त शुक्रवारी विराट जाहीर सभेचे आयोजन केले होते़ यावेळी ते बोलत होते.मंचावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान, आ. अमिता चव्हाण, प्रा.बालाजी गाढे, बी. आर. कदम, गोविंदराव नागेलीकर, जगदीश पाटील भोसीकर, आप्पाराव सोमठाणकर, गणपतराव तिडके, प्रकाशराव देशमुख, बाळासाहेब रावणगावकर, गोविंदबाबा गौड, सभापती झिमाबाई चव्हाण, नगराध्यक्ष संगिता चिंचाळकर, मंगाराणी अंबुलगेकर, भारतीबाई पवार, शेख युसूफ, नरसारेड्डी गोपीडवाड, पप्पू पाटील कोंडेकर आदी उपस्थित होते़खा.चव्हाण म्हणाले, नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळेच सरकार या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन अडचणी आणत आहे़ जिल्ह्यात अकराशे डीपी बंद कसे ?, गुळगुळीत रस्त्याचा दावा करणाऱ्या नितीन गडकरींना नांदेड ते भोकर रस्ता दिसत नाही का? असा सवालही त्यांनी केला. या सरकारने साडेचार वर्षांत शेतकºयांना काय दिले ? असे विचारुन इंग्रजांना काँग्रेसने जसे देशाबाहेर हाकलले तसे बोंडअळी, पीकविमा, कर्जमाफी यात शेतकºयांची घोर निराशा करणाºया सरकारला काँग्रेस सत्तेबाहेर फेकेल. आरक्षणाच्या बाबतीतही धनगर समाजाला दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही़ यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. नसीम खान, आ. अमिता चव्हाण यांनी सभेत सरकारच्या कार्यपद्धतीचा समाचार घेवून येणाºया काळात काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी केले. तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर यांनी आभार मानले.सरकारची अवस्था बोंडअळीसारखी - विखे पाटीलविरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले की, राज्यातील सरकारची अवस्था बोंडअळीसारखीच झाली आहे़ कारण, कापूसही नाही अन् बोंडअळी नुकसान भरपाईही नाही. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या भीतीने सरकारने १८० तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली. इतिहासात प्रथमच शेतकरी संपावर गेल्याची घटना या सरकारच्या काळात घडली. शेतक-यांना मदत देताना निकष लावले जातात़ तर मोठे उद्योगपती पळून गेले तेव्हा निकष कुठे होते ? सरकार धनदांडगे, पुंजीपतींचे असून छत्रपतींचे नाव घेवून सत्तेवर आलेल्या सरकारने स्मारकाची उंची कमी केली़ छत्रपतींचा अवमान करणारे सरकार शेतक-यांचा काय मान करणार, असेही ते म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील