शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

रणरणत्या उन्हात आजपासून शाळांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:17 IST

तापमानाचा पारा अद्यापही चाळीशीच्या पार असून रणरणत्या उन्हातच १७ जूनपासून जिल्ह्यातील शाळांना प्रारंभ होणार आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मृग नक्षत्र सुरू होवून आठ दिवस संपले तरीही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईच्या झळा कायम चार दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ अंशांवर स्थिर पाण्यासाठी भटकंती सुरूच

नांदेड : तापमानाचा पारा अद्यापही चाळीशीच्या पार असून रणरणत्या उन्हातच १७ जूनपासून जिल्ह्यातील शाळांना प्रारंभ होणार आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मृग नक्षत्र सुरू होवून आठ दिवस संपले तरीही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशा या दुष्काळी वातावरणात शाळांना प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे, या दुष्काळी परिस्थितीत सुरू होणाऱ्या शाळांबाबत जिल्ह्यातील एकाही पदाधिकारी अथवा लोकप्रतिनिधीने आवाज उठवला नाही, हे विशेष!जिल्ह्यात १७ जून रोजी शाळांना सुरुवात होत आहे. जिल्हा परिषदेच्या २ हजार २३९ शाळा तर पहिली ते बारावीपर्यंतच्या संपूर्ण शाळांची संख्या ३ हजार ७७६ इतकी आहे. या शाळांना १७ जून रोजी प्रारंभ होत आहे. जवळपास १२ लाख विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचणार आहेत. त्यातच पहिलीच्या प्रवेशालाही प्रारंभ होणार आहे. जवळपास १५ दिवस पटनोंदणी चालणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचाही १७ जूनपासून शोध घेतला जाणार आहे. या सर्व बाबी शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी केल्या जाणार असल्या तरीही दुष्काळी परिस्थितीचा मोठा अडसर या सर्व बाबींपुढे राहणार आहे. पाणीटंचाईची तीव्रता अद्यापही वाढतच आहे. जिल्ह्यातील टँकरची संख्या १४० वर पोहोचली आहे. मुखेड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंशावर कायम आहे.जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. मात्र या मागणीला प्रशासनाकडून अद्याप तरी प्रतिसाद मिळाला नाही. सुट्या वाढविण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र हा निर्णय शासनस्तरावरुन घेणे आवश्यक असल्याचे सांगत जिल्हा परिषदेने अंग काढून घेतले. या सर्व बाबींचा फटका १७ जूनपासून सुरू होणा-या शाळांना बसणार आहे.ग्रामीण भागात अद्यापही महिला-मुले पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. या परिस्थितीत शाळा सुरू होणे अडचणीचे ठरणार आहे. राज्य शासनाने दुष्काळी भागात शाळा-महाविद्यालयांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने टंचाईसदृश्य उपाययोजनेत शाळांनाही टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात टँकरची परिस्थिती पाहता ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये टँकर उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिल्यानंतरही टँकर उपलब्ध होत नसल्याची तक्रारी आल्या आहेत. त्यातच आता पाण्याचे स्त्रोतही बंद झाले आहेत. त्यामुळे शाळांना पाणीपुरवठा करायचा कुठून? हा प्रश्नही प्रशासनापुढे उभा टाकला आहे. अशा परिस्थितीत पाणी आणायचे कोठून? हा प्रश्न पुढे आला आहे. विदर्भात पाण्याच्या टंचाईमुळे २६ जूनपासून शाळा सुरू होतात. नांदेड जिल्ह्यात यावर्षी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने याबाबत ‘ब्र’ ही काढला नाही.आरटीईची दुसरी प्रवेश फेरी आज

  • बालकांचा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ३ हजार २४८ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असून पहिल्या फेरीत १ हजार ६४४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. दुसºया फेरीतील सोडत १७ जून रोजी होणार आहे. दुसºया फेरीत १ हजार ५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. याबाबत पालकांना मेसेज दिले जाणार असून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
  • जिल्ह्यातील शाळामध्ये प्रवेश घेणाºया मुलांचे पहिल्याच दिवशी पुष्प देवून स्वागत केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी हे आपआपल्या भागातील शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीRainपाऊसwater shortageपाणीटंचाई