नांदेड येथील पिटलाईन विस्तारीकरणामुळे काही रेल्वेगाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:06 IST2025-02-19T12:06:07+5:302025-02-19T12:06:38+5:30
या गाड्या जवळपास १५ दिवसांसाठी रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

नांदेड येथील पिटलाईन विस्तारीकरणामुळे काही रेल्वेगाड्या रद्द
नांदेड : येथे पिटलाईन क्रमांक-२ च्या विस्तारीकरणाच्या कामासाठी १७ फेब्रुवारी २०२५ ते ३ मार्च २०२५ या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. या कामामुळे काही रेल्वेगाड्यानांदेड येथील स्थानकावरून रद्द करण्यात आल्या आहेत.
गाडी क्र. ५७६५९ परभणी-नांदेड एक्स्प्रेस १९, २०, २२, २३, २६, २७ फेब्रुवारी आणि १ व २ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे, तर गाडी क्र. १७६२० नांदेड-औरंगाबाद एक्स्प्रेस २१ आणि २८ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. या गाड्या जवळपास १५ दिवसांसाठी रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
कुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या विशेष रेल्वेला परतूर येथे थांबा
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०७१०१/०७१०२ औरंगाबाद-पाटणा-औरंगाबाद या कुंभमेळा विशेष रेल्वेसाठी परतूर रेल्वे स्थानकावर तात्पुरता अतिरिक्त थांबा जाहीर केला आहे. औरंगाबाद ते पटना (प्रयागराज मार्गे) विशेष रेल्वे गाडी औरंगाबाद येथून १९ आणि २५ फेब्रुवारीला धावणार आहे. तसेच पटना ते औरंगाबाद ही विशेष रेल्वे पटना येथून २१ आणि २७ फेब्रुवारीला धावणार आहे. या दोन्ही विशेष गाड्यांना परतूर रेल्वे स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात आला आहे.