गोदावरीत उडी घेऊन सख्या बहिणींनी केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:32 IST2018-09-07T00:32:23+5:302018-09-07T00:32:51+5:30
नांदेड शहरातील नागसेन नगर येथे दोन सख्ख्या बहिणींनी गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

गोदावरीत उडी घेऊन सख्या बहिणींनी केली आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन नांदेड : नांदेड शहरातील नागसेन नगर येथे दोन सख्ख्या बहिणींनी गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.
नागसेननगर येथील रहिवासी असलेल्या सुचिता गुणवंत भगत (वय १९) आणि सुप्रिया गुणवंत भगत (वय १६) या दोघी बहिणी दुपारी तीनच्या सुमारास मंदिरात जातो असे सांगून असे घराबाहेर पडल्या. मात्र त्या सायंकाळपर्यत परतल्या नाहीत. त्याचदरम्यान काही प्रत्यक्षदर्शीनी सुप्रिया आणि सुचिताने गोदावरी नदीत उडी घेतल्याची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर या दोन्हींही मुलींचा शोध सुरु झाला. जीवरक्षक दल आणि पोलिसांनी शोध मोहीम राबविली. चार तासानंतर त्यांचे मृतदेह सापडले.
मयत सुचिता गुणवंत भगत ही बीएस्सी तर सुप्रिया भगत ही अकरावीत शिकत होती. दोघींच्याही आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.
दोन तरूणींनी पुलावरून गोदावरी नदीमध्ये उडी मारली असल्याची माहिती समजताच नाईक पो.कॉ.नामदेव सूर्यवंशी व पोउपनि. एस.ए. कदम अन्यपोलिस कर्मचाऱ्यांनी जीवरक्षक तसेच नागरिकांच्या सहकार्याने सायंकाळी सव्वासहावाजेदरम्यान मृतदेह शोधले. उपरोक्त दोन्ही मुलींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपूरी येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात हलविले. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत उत्तरीयतपासणी सुरू असल्याची माहिती तपासिक अमलदार नाईक पो.कॉ. प्रवीण केंदे्र, मदतनीस पो.कॉ. जुबेर चाऊस यांनी दिली आहे.