धक्कादायक! दारू सोडविण्याचे औषध प्यायल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 23:12 IST2018-12-06T23:10:18+5:302018-12-06T23:12:23+5:30
दारू सोडवण्याचे कथित औषध पिल्याने 2 सख्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

धक्कादायक! दारू सोडविण्याचे औषध प्यायल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
नांदेड : दारू सोडवण्याचे कथित औषध पिल्याने 2 सख्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नादेंड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात हा प्रकार घडला. आपले दारुचे व्यसन सोडविण्यासाठी हे दोन्ही भाऊ हदगाव येथे एका घरगुती उपचार करणाऱ्या व्यक्तीकडे गेले होते. मात्र, त्यांच्याकडील औषध पिल्यानंतर या दोघांचाही मृत्यू झाला आहे.
परळी तालुक्यातील संजय ज्ञानदेव मुंडे (वय 38), विजय ज्ञानदेव मुंडे (वय 35) अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत. परळी तालुक्यातून दारू सोडवण्याचे कथित औषध घेण्यासाठी ते आले होते. या घटनेने हदगावसह परळीतही खबळब उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येईल. त्यानंतर, त्यांचे मृतदेह कुटुबीयांच्या ताब्यात देण्यात येतील. दरम्यान, हदगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.