शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराजांनी नवीन विचार पेरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 01:07 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर संस्थानमध्ये अनेक पुरोगामी निर्णय घेताना नवीन विचार पेरले. कोणतेही राज्यकर्ते असो, सर्वांसाठी शाहू महाराजांचे कार्य अनुकरणीय असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचे प्रतिपादनछत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे थाटात अनावरण

नांदेड : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर संस्थानमध्ये अनेक पुरोगामी निर्णय घेताना नवीन विचार पेरले. कोणतेही राज्यकर्ते असो, सर्वांसाठी शाहू महाराजांचे कार्य अनुकरणीय असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.नांदेडमधील पावडेवाडी नाका परिसरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १२ फुटी उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज, पणतू श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी खा. चव्हाण होते. अध्यक्षीय भाषणात चव्हाण यांनी सांगितले, आज ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश दिला जात आहे. मात्र त्याकाळी शाहू महाराजांनी मुलींच्या शिक्षणावर भर दिला. सामाजिक एकोपा टिकविण्याची भावनाही त्यांनी जोपासली. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. करवीर संस्थानमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी घेतलेले अनेक प्रशासकीय निर्णय आजही परिणामकारक असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या निर्णयांचे दूरगामी परिणाम झाले आहेत. प्रतिगाम्यांचा विरोध न जुमानता त्यांनी काम केले.राजर्षी शाहू महाराज पुतळ्याच्या जागेसाठी अडचणी आल्या. या अडचणीवर मात करत हा पुतळा पूर्ण झाला आहे. महापालिका निवडणुकीत आम्ही जाहीरनाम्यामध्ये हा पुतळा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तो पुतळा आज पूर्ण होत आहे. याचा विशेष आनंद असल्याचे सांगताना त्यांनी महापौर शीला भवरे, आयुक्त लहुराज माळी आणि नगरसेवकांचे अभिनंदन केले. जागेसाठी तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काही मंडळींनी त्यांच्या नावाला विरोधही दर्शविला. मात्र त्यांना उत्तर देण्याचे हे ठिकाण नसल्याचे स्पष्ट करताना त्या विषयावर आपण स्वतंत्रपणे बोलू, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकारणासाठी २०१९ ची रणभूमी तयारच असल्याचेही ते म्हणाले. आ. राम पाटील यांना शुभेच्छा देत आपल्या सहा वर्षे निवडणुका नसल्याने कामे करायला आपल्याला वेळ आहे. आपल्या कार्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आमदारकी दिली आहे. आपण कोणत्या गटा-तटात नाही, हे यातून स्पष्ट झाले, असे सांगताना भाजपातील गटबाजीबाबतही चिमटा काढला.यावेळी माजी राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनीही राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य हे कोल्हापूर पुरतेच मर्यादित नव्हते तर संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शाहूंचा पुतळा नांदेडात होणे ही आम्हा कोल्हापूरवासियांसाठीही अभिमानाची बाब आहे. शाहू महाराजांचा समतेचा संदेश मार्गदर्शक असल्याचेही ते म्हणाले.माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांनीही या पुतळ्याच्या निर्मितीचा आढावा घेताना पालकमंत्री असताना आपण सदर कामाचे भूमिपूजन केल्याचे ते म्हणाले. या जागेसाठी कृषिमंत्री विखे पाटील यांनी मोठी मदत केली आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनीही पुतळा उभारणीसाठी पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी भाजपा आ. राम पाटील रातोळीकर यांनी राजर्षी शाहूंचा विचार समाजसुधारणेचा होता, असे सांगितले. या शाहूंच्या पुतळ्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेवून काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रभागातील नगरसेविका संगीता पाटील डक यांचेही समयोचित भाषण झाले. प्रास्ताविकात महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना पुतळा उभारणी संदर्भात माहिती दिली. सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले तर किशोर भवरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपमहापौर विनय गिरडे, नगरसेवक उमेश चव्हाण, बी.बी. गुपिले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील शिंदे, महिला व बालकल्याण सभापती संगीता तुपेकर, उपसभापती अलका शहाणे, नगरसेवक बापूराव गजभारे, दयानंद वाघमारे, किशोर स्वामी, उमेश पवळे, संजय मोरे, डॉ. रेखा चव्हाण, सुमती व्याहाळकर, कार्यकारी अभियंता गिरीष कदम, रत्नाकर वाघमारे, उपअभियंता दिलीप टाकळीकर, उद्यान अधीक्षक डॉ. फरहत उल्ला बेग आदींची उपस्थिती होती.याच कार्यक्रमात प्रा. संतोष देवराये यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर तयार केलेल्या डाक्युमेंट्रीचे विमोचन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. देवराये यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर डाक्युमेंट्री केली आहे.आम्ही विकासात कधी राजकारण करीत नाहीराजर्षी शाहूंच्या पुतळ्यामुळे नांदेडच्या वैभवात भर पडली आहे. हा भव्यदिव्य पुतळा पाहून शाहू महाराजांची ५६ इंचाची छाती होती. आता ५६ इंचाची छाती कोणाचीही राहिली नाही, असा टोलाही खा. चव्हाणांनी लगावला. मंचावर असलेल्या भाजपाचे आ. राम पाटील रातोळीकर तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून खा. चव्हाण म्हणाले, आज या कार्यक्रमास सर्वपक्षीय मंडळी उपस्थित झाली आहे. महापालिकेने सर्वांना निमंत्रित केले आहे.आम्हाला निमंत्रित केले नसले तरी आम्ही मात्र सर्वांना निमंत्रित करुन विकासात राजकारण करत नसल्याचे सांगितले. सर्वांनी एक पाऊल पुढे टाकत विकासासाठी नेहमीच एकत्र यावे.आश्वासने दिली तर ती पूर्ण करा- श्रीमंत शाहू४अलीकडच्या काळात राजकीय नेते भरमसाठ आश्वासने देतात पण ती पाळत नाहीत. यातून जनतेचा भ्रमनिरास होतो. त्यामुळे आश्वासने पाळणे शक्य असतील तरच ती द्यावीत. असा सल्ला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिला. आज मराठवाड्यात विकासाची परिस्थिती काहीअंशी सुधारली असली तरी त्यात मोठा बदल अपेक्षित आहे. राजकारण्यांनी बोलण्याऐवजी कृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आश्वासने दिली तर ती पूर्ण करा, असेही श्रीमंत शाहू महाराज म्हणाले. चव्हाण यांच्या कार्यशैलीबद्दल सांगताना चव्हाण जे बोलतात ते पूर्ण करतात, असेही म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाAshok Chavanअशोक चव्हाण