शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'स्टोनमन'ची दहशत? नांदेडपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 17:53 IST

मारेकऱ्याची माहिती द्या, २५ हजार मिळवा! पुण्यातील 'या' व्यक्तीवर पोलिसांचा संशय.

- गोविंद टेकाळेअर्धापूर (जि. नांदेड) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वृद्ध महिलांना लक्ष्य करून त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्याचे सत्र सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील दाभड येथील घटनेला महिना उलटत नाही तोच, छत्रपती संभाजीनगरमध्येही अगदी त्याच पद्धतीने एका ७५ वर्षीय शेतकरी वृद्ध महिलेचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमधील साम्य पाहता, हा सिरिअल किलर आहे की विकृत मानसिकतेचा मारेकरी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पहिली घटना अर्धापूर तालुक्यातील दाभड येथे २२ जानेवारी रोजी घडली. पार्वतीबाई प्रतापराव सूर्यवंशी (वय ७५ वर्षे ) या वृद्ध महिला नेहमीप्रमाणे शेताकडे जात असताना, अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. २१ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा येथे तशाच प्रकारची पुनरावृत्ती झाली. सुंदराबाई नामदेव जाधव (वय ७५ ) या वृद्ध महिला शेतात काम करत असताना त्यांच्यावर पाळत ठेवून अज्ञात आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा जीव घेतला. हा सर्व प्रकार नांदेडच्या घटनेशी जुळत आहे.

सिरिअल किलर की विकृत मानसिकता?दाभड येथील महिलेच्या अंगावर दागिने तसेच आहेत, चोरी किंवा दागिन्यांची लूट हा हेतू नसून केवळ हत्या करणे हाच त्याचा आनंद आहे का? तो ७५ वर्षीय वृद्ध महिला निवडतो आणि दगडाने त्यांचा खून करतोय का? विशेषत या दोन्ही घटनांमध्ये पीडित महिलांचे वय समान असून हत्येची पद्धत सारखीच आहे. घटनेचे ठिकाण शेताकडे जाणारा रस्ता, शेताचा परिसर आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतात एकट्या जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नांदेडच्या घटनेला २५ दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट असतानाच संभाजीनगरमध्ये ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हा एखादा सिरिअल किलर तर नाही ना? याचा तपास करणे आता पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.

संशयित आरोपीवर २५ हजारांचे बक्षीसदाभड (जि. नांदेड) या घटनेतील फरार असलेला संशयित आरोपी संभाजी उर्फ पोपट बबन दगडे (अंदाजे वय ४०, मूळ पत्ता रा. धनगरवाडा धोंडज, ता. पुरंदर, जिल्हा पुणे) असून हा संशयित अर्धापूर परिसरातील एका ढाब्यावर कामाला होता. त्यानेच ही निर्घृण हत्या केल्याचा प्रबळ संशय पोलिस यंत्रणेला आहे. या आरोपीवर २५ हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

२ ते ३ डझन हत्या करणाऱ्या स्टोनमन चर्चेतसाडेतीन दशक वर्षांपूर्वी मुंबई- कोलकत्ता येथे फुटपाथवर झोपलेल्या जवळपास दोन ते तीन डझन लोकांचा निर्दयीपणे २५ ते ३० किलो वजनाचा धोंडा डोक्यात घालून खून करणाऱ्या स्टोनमनच्या घटनेची आठवण ही या घटनेकडे पाहून येते. जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Stone-man Panic? Elderly Woman Murdered Similarly in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : Following a similar murder in Nanded, a 75-year-old woman was killed in Chhatrapati Sambhajinagar, raising fears of a serial killer. Both victims were elderly women attacked with stones, prompting a police investigation and public concern.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेड