रितेश-जेनिलिया घेणार राजकारणातील 'या' लोकप्रिय दाम्पत्याची मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 10:15 IST2020-02-10T10:15:11+5:302020-02-10T10:15:37+5:30

त्यामुळे सिनेजगतातील लोकप्रिय जोडी राजकारणातील लोकप्रिय दाम्पत्याची मुलाखत घेणार असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

Ritesh and Janilia will interview popular couple in politics | रितेश-जेनिलिया घेणार राजकारणातील 'या' लोकप्रिय दाम्पत्याची मुलाखत

रितेश-जेनिलिया घेणार राजकारणातील 'या' लोकप्रिय दाम्पत्याची मुलाखत

मुंबई : राजकारणातील लोकप्रिय दाम्पत्य, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण व अमिता चव्हाण यांची नांदेडमध्ये १४ फेब्रुवारी रोजी विशेष मुलाखत घेतली जाणार असून सिनेअभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख हे दाम्पत्य ही मुलाखत घेणार आहेत. शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर ही मुलाखत रंगणार आहे.

डॉ.शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने या मेगा मुलाखतीचे आयोजन केले आहे. दिवंगत नेते शंकरराव चव्हाण कौटुंबिक आयुष्यात कसे होते, करड्या शिस्तीचे भोक्ते असलेल्या नानांच्या हृदयाचा हळवा कोपरा कोणता होता, मुलांना आणि नातवंडांना त्यांनी काय शिकवण दिली, कोणते संस्कार दिले अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि अशोक चव्हाण व अमिता चव्हाण यांच्या आयुष्याचे समग्र दर्शन घडविण्यासाठी 'आनंदाचे डोही' या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यामुळे सिनेजगतातील लोकप्रिय जोडी राजकारणातील लोकप्रिय दाम्पत्याची मुलाखत घेणार असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. तर याच मुलाखतीच्या निमित्ताने चव्हाण दाम्पत्याच्या आयुष्यातील अनेक रंजक खिसे समोर येण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Ritesh and Janilia will interview popular couple in politics