भरधाव कारने चिमुकलीला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचे रस्त्यावर प्रेत ठेऊन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:53 IST2020-02-04T14:38:31+5:302020-02-04T14:53:11+5:30
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.

भरधाव कारने चिमुकलीला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचे रस्त्यावर प्रेत ठेऊन आंदोलन
नांदेड - रस्ता ओलांडत असताना कारच्या धडकेत अर्पिता गुंडेकर ( वय 6 वर्ष ) या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे घडली. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अर्पिता ही सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर रस्ता ओलांडत होती . त्याचवेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या कार ने तिला धडक दिली. त्यामुळे काही अंतरावर ती फेकल्या गेली. या अपघातात जागीच तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर वाहनधारक जागेवर न थांबता झाला फरार झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मुलीचे प्रेत रस्त्यावर ठेवून रास्तारोको आंदोलन केले.आरोपीला तात्काळ अटक करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली.