रेल्वेचे लाईन ब्लॉक, धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस अंशत: रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:50 IST2025-01-03T12:45:14+5:302025-01-03T12:50:02+5:30
औरंगाबाद-नांदेड एक्स्प्रेस गाडीचा सेवा दिवस आणि वेळेत बदल करण्यात आला आहे.

रेल्वेचे लाईन ब्लॉक, धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस अंशत: रद्द
नांदेड : नांदेडरेल्वे विभागातील रांजणी आणि कोडी दरम्यान ३ ते ९ जानेवारी या कालावधीत चार तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत आणि धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक (१७६८८) धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस ३, ५, ६, ९ आणि १० जानेवारी दरम्यान धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द राहील. या तारखेस ही गाडी नांदेड ते मनमाड अशी धावेल.
गाडी क्रमांक (१७६६१) काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस ४, ५, ८ आणि ९ जानेवारी रोजी ९० मिनिटे उशिराने धावेल. गाडी क्रमांक (१७२३२) नगरसोल-नरसापूर दवी-साप्ताहिक एक्स्प्रेस ४ जानेवारी रोजी ९० मिनिटे उशिराने धावेल. तर गाडी क्रमांक (१२७८८) नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस ५, ८ आणि ९ जानेवारी रोजी ९० मिनिटे उशिरा धावेल.
या गाडीच्या दिवसात बदल
गाडी क्रमांक (१७६१९) औरंगाबाद-नांदेड एक्स्प्रेस गाडीचा सेवा दिवस आणि वेळेत बदल करण्यात आला आहे. ही गाडी पूर्वी सोमवारी औरंगाबाद स्थानकावरून मध्यरात्री १:०५ वाजता सुटायची. त्या गाडीचा वेळ बदलल्याने ही गाडी रविवारी रात्री ११:३० वाजता सुटेल. मध्यरात्री १:०५ वाजता औरंगाबादवरून सुटणारी ही गाडी सोमवारीच पहाटे ६:१५ वाजता नांदेडला पोहचायची. ती गाडी आता सोमवारी पहाटे ४:३० वाजता नांदेडला पोहचेल.