गर्भवती पत्नीचा गळा आवळून पतीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:33 IST2019-04-08T16:32:18+5:302019-04-08T16:33:01+5:30

पती-पत्नीमध्ये मध्यरात्री झाला वाद

Pregnant wife killed then husband commit suicide | गर्भवती पत्नीचा गळा आवळून पतीने केली आत्महत्या

गर्भवती पत्नीचा गळा आवळून पतीने केली आत्महत्या

कृष्णूर (जि. नांदेड) :  गुढीपाडव्याच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादात पतीने सात महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. नंतर स्वत:  गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभांगी गंगाधर गवाले (२०) असे मृत पत्नीचे नाव असून गंगाधर भुजंग गवाले (२२) असे पतीचे नाव आहे. ही दुर्देवी घटना  रविवारी सकाळी उघडकीस आली़ वर्षभरापूर्वी त्यांचा विवाह झाला होता.

सात महिन्यांची गरोदर असलेली शुभांगी एक महिन्यापूर्वी माहेरी कृष्णूर येथे होती़ त्यानंतर दोन दिवसांपूर्वी तिचा पती गंगाधर गवाले हा पत्नीला भेटण्यासाठी म्हणून कृष्णर येथे आला होता़ दोघेही पती-पत्नी पाडव्याच्या संध्याकाळी जेवण करून घरामध्ये झोपले  होते़ दोघांमध्ये रात्री कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला होता़ त्या वादानंतर गंगाधर गवाले याने गळा आवळून पत्नी शुभांगीचा खून केला़ त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली़  घटनेची माहिती कुंटूर पोलिसांना कळविण्यात आली़ सपोनि. शरद मोरे व त्यांचे सहकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी  स्थळाचा पंचनामा केला़ 

शेजाऱ्यांच्या मदतीने उघडला दरवाजा 
सकाळी शुभांगीची आजी त्यांना बाहेरून आवाज देत होती़ परंतु आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिने खिडकीतून आतमध्ये पाणी टाकले़ तरीही दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने तो उघडण्यात आला़ यावेळी खाटेवर नात शुभांगी मृतावस्थेत पडलेली दिसून आली तर नातजावई गंगाधर भुजंगा गवाले याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.  

Web Title: Pregnant wife killed then husband commit suicide