पोलिसांचा दणका! आठ सराईत गुन्हेगार नांदेड जिल्ह्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:23 IST2025-06-06T17:22:51+5:302025-06-06T17:23:09+5:30

आठ सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई

Police crackdown! Eight criminals deported from Nanded district for six months | पोलिसांचा दणका! आठ सराईत गुन्हेगार नांदेड जिल्ह्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार

पोलिसांचा दणका! आठ सराईत गुन्हेगार नांदेड जिल्ह्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार

नांदेड : जिल्ह्यातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय, तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या आठ सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या आठही गुन्हेगारांना सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

ऋत्विक गोपाळ पदमवार (वय २२, रा. विष्णुपुरी), आकाश आनंदराव कदम (२१, रा. वाघाळा), दिलीप डाकोरे (२७, रा. कौठा), ज्ञानेश्वर नरहरी पुंडवय (३४, रा. कौठा) व इतर चार अशा आठजणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. या आठही गुन्हेगारांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिसांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही या गुन्हेगारात कोणतीच सुधारणा होत नसल्याने त्यांचे विरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे ३४ प्रस्तावर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठविले. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी यांनी आठ प्रस्ताव मंजूर करीत त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली. जिल्ह्यात सन २०२४-२५ या वर्षात एकूण ८७ गुन्हेगारांना हद्दपार केले.

Web Title: Police crackdown! Eight criminals deported from Nanded district for six months